कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी:आगामी सण-उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करा; उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन.

*🛑सावंतवाडी:आगामी सण-उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करा; उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-*​

आगामी काळात येणारे विविध सण आणि उत्सव नागरिकांनी आपली परंपरा जपत, शांतता राखून साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच समाजघटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले आहे.

​सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर उपस्थित होते.

​सण आणि परंपरेवर चर्चा:

​या बैठकीत प्रामुख्याने शिवजयंती, रमजान ईद, शिमगोत्सव, होळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा या सणांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील सण-उत्सवांची मोठी परंपरा असून, ही परंपरा जोपासताना कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपस्थित सर्व मान्यवर आणि शांतता समितीच्या सदस्यांनीही सर्व सण शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करण्याची ग्वाही यावेळी दिली.

​या बैठकीचे औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तौकीर शेख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

​या बैठकीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक तौकीर शेख, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, संजय लाड, कृष्णा धुळपनावर, साईराज नार्वेकर, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर, अखिल भारतीय मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर, पोलीस कर्मचारी अमित राऊळ यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!