कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत नळयोजनेचे काम बंद पाडले.

*🛑सावंतवाडीत नळयोजनेचे काम बंद पाडले.*

 

*🛑काम चुकीच्या पद्धतीने, देव्या सूर्याजी यांचा आरोप: ५७ कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे ५७ कोटीच्या नळपाणी योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केला. सूर्याजी व नागरिकांनी सदर काम बंद पाडले प्रभारी मुख्याधिकारी व न. प. पाणीपुरवठा विभाग योजना प्रमुखदेखील या कामाबाबत अनभिज्ञ असून योग्य पद्धतीने काम सुरू करावे,अशी मागणी सूर्याजी यांनी केली आहे.

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य लाईन ही जवळपास ५५ वर्षापेक्षा जुनी आहे शहरातील वाढती लोकसंख्या व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेली सुमारे ५७ कोटींची नळपाणी योजना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. मात्र, सध्या चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू आहे. नरेंद्र डोंगर ते पाळणेकोंड धरणापर्यंत ही मेन पाईपलाईन जाणार असून किमान पुढच्या २५ वर्षांची सोय यामुळे होणार आहे. परंतु, नगरपरिषद प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. खोदकाम योग्य पद्धतीने होत नसून भूमिगत असणारे चारही पाईप एकावर एक अशा पद्धतीने घातले जात आहे. हे पाईप एकावर एक न ठेवता वेगवेगळे असणे आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात देखभाल दुरुस्ती दरम्यान कठीण होऊ शकते व आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागू शकतो, असे मत सूर्याजी यांनी व्यक्त केले. महत्वाच्या मेन पाईपलाईनचे काम सुरू असताना न. प. चे कोणीही अधिकारी,कर्मचारी हजर नसतात. नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे त्यांना या कामाची माहिती नसल्याचे दिसते. तसेच प्रभारी मुख्याधिकारी यांना याबाबत विचारले असता तेदेखील अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याचा आरोप सूर्याजी यांनी केला. शनिवारी माठेवाडा परिसरात होणारे काम त्यांनी रोखत पाळणेकोंड धरणापर्यंत जाणाऱ्या मेन पाईपलाईनचे काम योग्य पद्धतीने करावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा ५७ कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!