कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे आंबा-काजू बाग जळाली; नुकसानभरपाई न मिळाल्याने चौकेकर कुटुंबाचे आमरण उपोषण.

*🛑महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे आंबा-काजू बाग जळाली; नुकसानभरपाई न मिळाल्याने चौकेकर कुटुंबाचे आमरण उपोषण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* विद्युत वाहिनीला सलग दोन वर्ष शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई न मिळाल्याने केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी महावितरण कार्यालय, सावंतवाडी समोर आमरण उपोषण छेडले आहे.

चौकेकर यांनी सांगितले की, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५ रोजी महावितरणच्या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या ५ एकर आंबा व काजू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बागेतील झाडे व कलमे पूर्णतः जळून खाक झाली. मात्र, या घटनेला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नाही.

चौकेकर यांच्या मते, या दोन घटनांमध्ये एकूण सुमारे ९० लाख रुपयांचे नुकसान झाले असून महावितरणकडून केवळ १ लाख ८७ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असून या मदतीतून पुन्हा बागायत उभी करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा महावितरणमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच परिसरातील जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा वारंवार अपघातास कारणीभूत ठरत असल्याने संबंधित विद्युत वाहिनीचा मार्ग बदलून ती इतर मार्गाने वळविण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, नुकसानभरपाई मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा चौकेकर कुटुंबीयांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!