कोकणराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◼️ पाणीपट्टी दरवाढीला शिवसेना नगरसेवकांचा जोरदार आक्षेप

◼️ नगरसेवकांचा आक्षेप ; नगराध्यक्ष संजू परबांनी आरोप फेटाळले..

🖥Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:सावंतवाडी

सावंतवाडी दि.२६:- सावंतवाडी येथिल पालिकेचा आज तीस कोटी रुपयाचा शिल्लकी अर्थसंकल्प नगराध्यक्ष संजू परब यांनी सादर केला.यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे.तर १९ हजार लिटर मागे फक्त दोन रुपये दर वाढ करण्यात आली आहे.दरम्यान या वाढी विरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी आक्षेप नोंदवत झालेली वाढ ही चुकीची आहे.नागरीकांना पाण्याच्या विविध प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या वाढीला आमचा विरोध असल्याचे सांगितले.मात्र त्यांचे म्हणणे खोडून काढत नगराध्यक्षांनी १२ विरुध्द ४ असे मतदान घेवून हा अर्थसंकल्प संमत केल्याचा दावा केला.तसेच कोणताही अभ्यास करून न येता विरोधकांनी अर्थसंकल्पावर बोलायचे सोडुन पाणी येत नाही,पोहोचत नाही,अशी हास्यास्पद चर्चा केल्याची टिकाही श्री.परब यांनी यावेळी केली. पालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज येथे नगराध्यक्ष परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी या बैठकीत मुख्याधिकारी जयंत जावडेकर,उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,नगरसेवक सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी, राजू बेग,मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर , नासिर शेख, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर,दिपाली सावंत ,समृद्धी विरनोडकर ,दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!