निरंकारी मंडळातर्फे चिपळुणात विविध ठिकाणी बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा
निरंकारी मंडळातर्फे चिपळुणात विविध ठिकाणी बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा
*🖥️ Kokan Live Breaking News*
*▪️प्रतिनिधी: संतोष पिलके*
*▪️चिपळूण*
निरंकारी बाबा हरदेव निरंकारीनिरंकारीसिंहजी महाराज यांच्या ६७ व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे दि. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक निरंकारी परिवाराने जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे, हा अभियानाचा उद्देश असून, बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण साकार करावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी मंडळाच्या चिपळूण,तुरंबव आणि घोणसरे शाखेंच्या वतीने तुरंबव,निवळी,घोणसरे,कळमुंडी,बोरगांव,रामपूर आणि कळवंडे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. चिपळूण क्षेत्राचे क्षेत्रिय प्रबंधक महात्मा प.पू.गंगाधर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ब्रँच मुखी प.पू.मधुकर पंडित व प.पू.लक्ष्मण बोबले यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी निरंकारी सेवादल युनिट क्र.८०१ चे संचालक प.पू.हरिश्चंद्र साळुंखे आणि महिला व पुरुष सदस्य तसेच सत्संग सदस्य, अबालवृद्ध उत्साहात या अभियानात सहभागी झाले होते.*
यावेळी वर उल्लेख केलेल्या परिसरात उपस्थित महात्मा व साध संगतच्या हस्ते ५० हापूस आंबा कलमांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातही निरंकारी भक्तांनी आपआपल्या भागात वृक्षारोपण केले. यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन व सेवादल च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_