कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑‘मी तुमच्यातलाच एक’ — बाबुराव धुरी यांचा मतदारांशी हृदयस्पर्शी संवाद.

*🛑‘मी तुमच्यातलाच एक’ — बाबुराव धुरी यांचा मतदारांशी हृदयस्पर्शी संवाद.*

 

*🛑पैशाच्या राजकारणाला नकार; प्रामाणिक सेवेच्या बळावर मशाल चिन्हाला साथ देण्याचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०६:-*“माझ्या मतदारसंघातील प्रिय,सुज्ञ आणि सजग मतदार बंधू-भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र…” या शब्दांतून माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबुराव धुरी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. मी तुमच्यातलाच एक असून, तुमच्या सुख-दुःखाचा कायमचा सोबती आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी आजवरचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी दिल्याचे अधोरेखित केले.

सध्या अनेक उमेदवार प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहोचत असले, तरी खऱ्या अडचणीच्या वेळी, घराघरांत आणि अश्रूंमध्ये कोण उभं राहिलं? असा सवाल उपस्थित करत धुरी यांनी “जिथे कमी, तिथे बाबुराव धुरीची हमी” या एकाच सूत्रावर आयुष्यभर काम केल्याचे स्पष्ट केले.

आजचे राजकारण पैशाच्या प्रदर्शनाकडे झुकत चालल्याची खंत व्यक्त करताना धुरी म्हणाले की, “मी पैसे, वस्तू किंवा कोणतीही प्रलोभनं देऊ शकत नाही; मात्र प्रामाणिकपणा, निष्ठा, संघर्ष आणि विकासासाठीची तळमळ याची हमी आयुष्यभर देऊ शकतो.” दोन दिवस आधी आश्वासनांची खैरात वाटणाऱ्यांपेक्षा, दुःखात ढाल बनून उभा राहणारा आणि सुखात खांद्याला खांदा लावणारा सच्चा सेवक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केलेली लोकशाही आज धोक्यात असल्याचे नमूद करत, पैशाच्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे ठाम मत धुरी यांनी मांडले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही विचारधारा आजही आमचा श्वास असल्याचे सांगत, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाला बळ देण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

शेवटी, “मशाल चिन्हासमोरील बटन दाबा आणि तुमच्याच हक्काच्या, कामाच्या, प्रामाणिक माणसाला सेवेची एक संधी द्या,” असे सांगत त्यांनी मतदारांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!