🛑कवठणी गावच्या श्री काजरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव २८ रोजी.
*🛑कवठणी गावच्या श्री काजरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव २८ रोजी.*
*🛑”केळ्याच्या घडांची “जत्रा म्हणून ही सर्वत्र प्रसिद्ध.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध असलेलं कवठणी येथील जागृत देवस्थान म्हणजे “श्री देव काजरोबा” .गोवा व सिंधुदुर्ग च्या सीमेलगत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कवठणी गावातील जागृत देवस्थान म्हणजे श्री काजरोबा देवस्थान.
“श्री देव काजरोबा” देवाचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी संपन्न होत असून”भाविक भक्त,चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होत आहेत.
श्री देव काजरोबा जत्रोत्सव हा”केळ्याच्या घडांची जत्रा” म्हणूनही सर्वदूर प्रसिद्ध आहे.
हाकेला धावणारा नवसाला पावणारा म्हणून या देवतेची सर्वदूर ख्याती असून,भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या देवतेसमोर नतमस्तक होताना दिसतात.
या जत्रोत्सवादिवशी भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी,नवस फेडण्यासाठी “केळ्यांचा घड” देवाला अर्पण करतात.
या जत्रेतील खास वैशिष्ट्य म्हणजे,या देवतेला केळ्यांच्या घडांचा नवस भाविकांकडून बोलला जातो आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाली की केळ्यांचा घड जत्रे दिवशी अर्पण करून नवस फेडला जातो.
जत्रेदिवशी गावात जणू उत्सवाचेच स्वरूप असते.सकाळ पासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम,केळ्यांच्या घडांची आरास केली जाते.
या दिवशी गोवा,सिंधुदुर्ग सहीत परगावी असलेले भाविक,चाकरमानी,ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
संपूर्ण सिंधुदुर्ग व गोवा राज्यातही प्रसिद्ध असणारा श्री देव काजरोबाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक भक्त दर्शनासाठी येतात.स्थानिकांकडूनही या जत्रौत्सवाच नियोजन योग्यरीतीने केलं जात.
रात्री ९ वाजल्यापासून घडांची पावणी सुरू होऊन पहाटे ४ वाजेपर्यंत पावणी सुरू असते, त्यानंतर पार्सेकर दशावतारचा नाट्यप्रयोग होतो.
जत्रेदिवशी मंदिराला खास फुलांची आरास,विद्युत रोषणाई करण्यात येते.वेगवेगळी दुकाने सजली जातात.यावेळी मोठी आर्थिक उलाढालही होत असते.
दिनांक २९ व ३० जानेवारी रोजी खास मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,गुरुवार दिनांक २९ जानेवारी रोजी रात्रौ ठीक १०:०० वाजता उद्योजक दत्ता कवठणकर मित्र मंडळ आयोजित,डायमंड डान्स क्रियेशन मुंबई,यांचा अविस्मरणीय नृत्याविष्कार “धुंद रंग नृत्याचा” हा लावणी, फोकडान्स वेस्टर्न,कॉमेडी नृत्याविष्कार चा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच शुक्रवार दिनांक ३० जानेवारी रोजी रात्रौ ठीक १०;०० वाजता “रेन्बो फ्रेंड सर्कल ,कवठणी यांच धम्माल विनोदी नाटक,”आलाय मोठा शहाणा” आयोजित करण्यात आले आहे.
तरी या जत्रोत्सवासाठी व कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कवठणी ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*✨ नोकरीची सुवर्णसंधी! नोकरीची सुवर्णसंधी!! ✨*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
_कुडाळमधील नामांकित *’हॅप्पी मेडिकेअर’* कंपनीमध्ये ऑफिस कामासाठी पात्र महिला आणि मुलींची त्वरित भरती करणे आहे._
*🔹 पद:-* ऑफिस असिस्टंट / कार्यालयीन काम
*🔹 पात्रता:-* १२ वी, B.A., M.A., B.Ed.
*🔹 वयोमर्यादा:-* २० ते ४० वर्षे
*📍 पत्ता:-*
सावंत कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
एस.टी. स्टँड जवळ, नक्षत्र टॉवरच्या समोर,
देवगड अर्बन बँकेच्या वरती, मेन रोड, कुडाळ.
📞 आजच संपर्क साधा:
9130134218 / 9504959909
मर्यादित जागा उपलब्ध! त्वरित संपर्क करा.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

