कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

*आरोंद्यात बंडखोरीला अखेर पूर्णविराम*; *अमेय आरोंदेकरांचा अर्ज माघारीचा निर्णय*

*आरोंद्यात बंडखोरीला अखेर पूर्णविराम*; *अमेय आरोंदेकरांचा अर्ज माघारीचा निर्णय*

स्वीकृत जि.प. सदस्यत्वाच्या अटीवर तोडगा शिवसेना-भाजप युतीची ताकद पुन्हा एकवटली

आरोंदा | प्रतिनिधी
आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमेय आरोंदेकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याच्या अटीवर झालेल्या यशस्वी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे आरोंद्यातील राजकीय समीकरणांना पूर्णविराम मिळाला आहे.
आज सकाळी ठीक १० वाजता आमदार दिपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा तोडगा निघाला. या बैठकीला आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, बंडखोर उमेदवार अमेय आरोंदेकर तसेच आरोंद्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर अंतिम निर्णय आरोंदा गावात जाऊन जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार संध्याकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी आरोंद्यात येत ग्रामस्थांशी संवाद साधला.
अमेय आरोंदेकर यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यास मान्यता देण्यात आली, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.
या निर्णयानंतर आरोंदा पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आजपासून महायुतीचा अधिकृत उमेदवार श्री. सुधन कवठणकर यांच्या प्रचारात मोठ्या ताकतीने सक्रिय होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची ताकद पुन्हा एकवटली असून, निवडणूक लढतीला वेगळीच दिशा मिळाली आहे.
दरम्यान, अमेय आरोंदेकर यांनी आरोंदा गावाला पुन्हा १२ वर्षानंतर जि प. मधे प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचे आभार मानले व
आरोंद्यातील बंडखोरीचा अध्याय संपुष्टात येत आता युतीचा प्रचार रणसंग्राम सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!