कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा विजेती ठरली सौ.विशाखा चिंदरकर.

*🛑पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा विजेती ठरली सौ.विशाखा चिंदरकर.*

 

*🛑माघी गणेश जयंती निमित्ताने पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्र मंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २६:-* पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाची विजेती ठरली ती सौ.विशाखा चिंदरकर तर उपविजेती ठरली ती सौ.गौतमी गोवेकर व तृतीय क्रमांक तनुश्री परब,उत्तेजनार्थ नीलम पटेल, सावली कामत, सानवी बुटे.

विजेती सौ. विशाखा चिंदरकर हीला मानाची पैठणी,स्मृतिचिन्ह व रोख रुपये त्याचप्रमाणे माजी सरपंच डींगणे नितीन सावंत यांच्याकडून रोख रुपये २००० देण्यात आले.तर उपविजेत्या ठरलेल्या सौ. गौतमी गोवेकर हीला पैठणी स्मृतिचिन्ह,तृतीय क्रमांक सौ तनुश्री परब हीला पैठणी व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी सरपंच डिंगणे, नितीन सावंत,महिला भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,सुरेश चिंदरकर.मंडळाचे अध्यक्ष सुनील माजगावकर, उपाध्यक्ष सचिन वीर,रुपेश माजगावकर,दादा साळगावकर, यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

संगीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. महिलांसाठी बरेच खेळ वेळ देऊन करून घेण्यात आले.सुरुवातीला जवळपास ६० महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.परंतु प्रत्येक खेळामध्ये बाद फेरी असल्याने बरेच महिला या खेळातून बाद झाल्या होत्या. फक्त निवडक सहा महिला संगीत खेळ पैठणीच्या शेवटच्या फेरीत पोचल्या होत्या. शेवटची फेरी अतिशय चुरशीची ठरली.यामध्ये तीन जणांचे समान गुण असल्याने शेवटी पुन्हा एक फायनल फेरी घेण्यात आली.आणि या फायनल फेरीमध्ये सौ.विशाखा चिंदरकर हीने बाजी मारत संगीत खेळ पैठणीच्या खेळामध्ये आपले नाव कोरले.

कार्यक्रमाचे बक्षीस वितरण श्री दिगंबर गायतोंडे, श्री.समीर धारगळकर, गजानन गायतोंडे, सचिन वीर,अनिल माजगावकर,रुपेश माजगावकर, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब तर आभार श्री गजानन गायतोंडे यांनी मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!