कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑निगुडे येथे श्री देवी माऊलीचा पहिला वर्धापन दिन; २७ व २८ जानेवारीला धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी.

*🛑निगुडे येथे श्री देवी माऊलीचा पहिला वर्धापन दिन; २७ व २८ जानेवारीला धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- २४:-* निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान, निगुडे यांच्या पुनःप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन मंगळवार व बुधवार, दिनांक २७ व २८ जानेवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

या वर्धापन दिनानिमित्त सग्रहमख नवचंडी व सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी पहिल्या दिवशी सकाळी ८.०० वाजता मंगलाचरण, प्रायश्चित्त विधी, यजमानांचे पंचगव्य प्राशन, सर्व देवतांचे आवाहन, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वर्णन, प्राकारस्थळ शुद्धी, मुख्यदेवता स्थापना, सप्तशक्ती पाठवाचन, सुहासिनींसाठी कुंकूमार्जन तसेच परिवार देवतांवर अभिषेक-पूजन होणार आहे.सकाळी ११.०० वाजता सुवासिनींसाठी कुंकूमार्जन, दुपारी १.०० वाजता महाप्रसाद तर रात्री ९.०० वाजता वे.शा.सं. श्री गणेश उर्फ राजू जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता रोणापाल, इन्सुली, वेत्ये व सोनुर्ली गावच्या शिमघडे मानकरी व ग्रामस्थांचे आगमन व स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता मंगलाचरण, अग्निस्थापना, सग्रहमख, सप्तशती हवन, सत्यनारायण महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्यादी ब्राह्मण पूजन, कुमारीका पूजन, कुष्मांड बलिदान, आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, दुपारी ३.०० वाजता माऊली देवीचे दर्शन, ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रम पार पडणार असून, रात्री ८.०० वाजता नवमीच्या मध्यरात्री गाजलेले ऐतिहासिक महानाट्य गणेश कला व सांस्कृतिक मंडळ, हळर्ण (किल्ला गोवा) यांच्या सादरीकरणाने भाविकांना पर्वणी मिळणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना मित्रमंडळी, आप्तेष्ट व कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवी माऊलीचा कृपा-आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी, नवरात्र उत्सव समिती, महिला कमिटी तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र शशिकांत गावडे व सचिव श्री. गुरुदास वासुदेव गवंडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!