◼️पिकुळे तिठा ते उसप रस्त्याचे काम होत आहे निकृष्ट दर्जाचे;अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
◼️निकृष्ट दर्जाचे काम रोखणार:उसप सरपंच दिनेश नाईक आक्रमक
🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि,२४:- पिकुळे तिठा ते उसप या रस्त्याचे काम गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे मात्र ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.गेल्या सात दिवसात एकही अधिकारी रस्त्याचे काम पाहण्यासाठी आले नाही, तसेच ठेकेदार सुध्दा या कामाकडे पाठ फिरवत आहे. गेल्या सात दिवसात फक्त पन्नास मीटर रस्ता केला तो देखील अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे.
त्यामुळे उसप सरपंच दिनेश नाईक आक्रमक झाले व ते निकृष्ट दर्जाचे काम थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्यानंतर जो पर्यंत ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी तेथे येत नाही तोपर्यंत काम सुरू करायला देणार नाही असा इशारा उसप सरपंच दिनेश नाईक यांनी दिला

