कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नळजोडणीला बळजबरीने अटकाव; तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा.

*🛑नळजोडणीला बळजबरीने अटकाव; तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आंबोली (बाजारवाडी) येथील रहिवासी श्री. दत्ताराम रामचंद्र कर्पे यांनी त्यांच्या मालकीच्या इमारत क्रमांक १७०७ ला पिण्याच्या पाण्याचे अधिकृत नळ कनेक्शन जोडण्यास काही व्यक्तींनी बळजबरीने अटकाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करत दोषींवर तात्काळ कारवाई व नळजोडणीस परवानगी देण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ८ डिसेंबर २०२५ रोजी सदर नळ कनेक्शन अधिकृतरित्या मंजूर झाले होते. त्यानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी व अर्जदार नळजोडणीसाठी गेले असता श्री. विजय कृष्णा जाधव व श्री. सुधाकर कृष्णा जाधव तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी दादागिरी करत कामास अटकाव केला.

ही नळजोडणी ग्रामपंचायत रस्त्याच्या साईट पट्टीतून असून त्यासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखलाही प्राप्त असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र तरीही संबंधित व्यक्तींनी कामगारांना धमकावत पुन्हा जोडणी केल्यास नळ कापून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचप्रमाणे, अर्जदाराच्या घराकडे जाणारा ग्रामपंचायत रस्ता असूनही त्यावरून ये-जा करताना खोटे आरोप करून कोर्टात गोवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वीही वीज वायर तोडण्याचे प्रकार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे न्याय मिळावा म्हणून सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा अर्जदाराने दिला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही उपोषण करावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, उपोषणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

या प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व संबंधित विभागांना देण्यात आली असून प्रशासन या प्रकरणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!