कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गचे राजकारण : नारायण राणे नावाची वास्तवाची भिंत

*🛑सिंधुदुर्गचे राजकारण : नारायण राणे नावाची वास्तवाची भिंत*

 

*🛑नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग हे एका झटक्यात झालेल्या युतीने पुन्हा एकदा झालं सिध्द.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २०:-* सिंधुदुर्गच्या राजकारणात एक सत्य आहे जे कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी दर निवडणुकीला उघडे पडते—या जिल्ह्यात अंतिम शब्द नारायण राणेंचाच चालतो.हे मत नाही, ही भक्ती नाही,ही अतिशयोक्ती नाही;हा तीन दशकांचा राजकीय अनुभव आहे.

1990 पासून आजपर्यंत सिंधुदुर्गच्या राजकारणात अनेक प्रयोग झाले.पक्ष बदलले, झेंडे बदलले, घोषणा बदलल्या;

पण नेतृत्व बदलले नाही.कारण नेतृत्व कागदावर नसते, ते लोकांच्या मनावर कोरलेले असते—आणि ती कोरीव अक्षरे म्हणजे नारायण राणे.

राणे सांगतील ते धोरण,राणे बांधतील ते तोरण—हा अलिखित नियम आजही जिवंत आहे.

कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश लागत नाहीत;त्यांना दिशा मिळते.

या जिल्ह्यात राणेंनी कार्यकर्ते घडवले नाहीत,नेते निर्माण केले.त्यांना केवळ ओळख दिली नाही, तर राजकीय अस्तित्व दिले.आज जे मोठ्या पदांवर, वेगवेगळ्या पक्षांत बसले आहेत,त्यांची मुळे अजूनही राणेंच्या राजकारणातच रुजलेली आहेत.

विचार वेगळे झाले असतील, पक्ष वेगळा असू शकतो;पण नेतृत्वावरचा विश्वास अजूनही एकच आहे.

म्हणूनच खासदारकीच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोणतेही राजकीय गणित न पाहता

भरभरून मते दिली.तो विजय केवळ उमेदवाराचा नव्हता;तो नेतृत्वावरच्या श्रद्धेचा कौल होता.

मात्र अलीकडील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनी एक कटू वास्तव समोर आणले.नारायण राणे निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिले—आणि राजकारणाची चाकं घसरली.

युती तुटली, कार्यकर्ते संभ्रमात पडले,

आणि दोन्ही पक्षांचे नुकसान झाले.

कारण इथे पक्षांपेक्षा मोठं एक सत्य आहे—दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते राणेंचेच आहेत.नेतृत्व नसले की मतभेद वाढतात.मतभेद वाढले की वैर जन्माला येते.आणि त्या वैराचा फायदा नेहमी तिसराच घेतो.

हा धडा सिंधुदुर्गने अनुभवातून शिकलेला आहे.

म्हणूनच जिल्हा परिषद निवडणुकीत नारायण राणे पुन्हा पुढे आले—आणि राजकारण कसं हाताळायचं,याचं प्रात्यक्षिक पहिल्याच फटक्यात दाखवलं.

कोणतीही संदिग्ध भूमिका नाही.

कोणताही वेळकाढूपणा नाही.

थेट युती जाहीर.आणि दुसऱ्याच दिवशी जागावाटप घोषित.हा निर्णय नव्हता;तो अधिकार होता.हो, इच्छुकांची संख्या मोठी आहे.

बंडखोरीची शक्यता आहे.पण बंडखोरी घडू देऊन राजकारण उद्ध्वस्त होऊ देणारे हे नेतृत्व नाही.

राणेंचं नेतृत्व संघर्ष निर्माण करत नाही;ते संघर्ष शमवतं.पालकमंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे,

आणि आमदार दीपक केसरकर—

या सगळ्यांना एकत्र ठेवणारी गोष्ट म्हणजे राणेंची राजकीय शिस्त.

ही शिस्त हुकूमशाही नाही,

ती अनुभवातून आलेली गरज आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने

नारायण राणेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की—सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे.बाकी सर्व भूमिका,

बाकी सर्व चेहरे,बाकी सर्व प्रयोग—

परिघावरचे आहेत.

कोकणात आणि सिंधुदुर्गात

राणेंना वगळून बेरजेचं राजकारण

कधी झालं नाही आणि पुढेही होणार नाही.कारण आज जे शिंदे शिवसेना आहे,आणि जे भाजपा आहे,

त्यांचा पाया मोठ्या प्रमाणावर

राणेंनी घडवलेल्या कार्यकर्त्यांवरच उभा आहे.म्हणूनच पक्षांचा राणेंवर विश्वास आहे.तो विश्वास अंध नाही;

तो तपासलेला आहे.आणि राणेंनी तो

वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेला आहे.आज कोकणाच्या

राजकारणावर पुन्हा एकदा ठळक अक्षरांत लिहिलं गेलं आहे—

नेतृत्व बदलू शकतं,सत्ता येऊ–जाऊ शकते;पण सिंधुदुर्गचा कणा अजूनही नारायण राणेच आहेत.हे मान्य न करणंराजकारण न समजण्याचं लक्षण नाही;ते वास्तव नाकारण्याचं धाडस आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!