कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव जि.प. मतदारसंघात ‘विक्रांत सावंत’ मैदानात – निवडणुकीला वेगळीच धार!

माजगाव जि.प. मतदारसंघात ‘विक्रांत सावंत’ मैदानात – निवडणुकीला वेगळीच धार!

सावंतवाडी –
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विक्रांत सावंत यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली असून मंगळवार दि. २० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या घोषणेमुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे निरंतर समाजकार्य, थेट जनसंपर्क आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे विक्रांत सावंत हे जनतेमध्ये विश्वासार्ह नाव ठरले आहेत. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तालुक्यांत कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, आरोग्य, शिक्षण आणि युवक प्रश्नांवर त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे.
“फक्त आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष काम” हीच ओळख असलेल्या विक्रांत सावंत यांची उमेदवारी म्हणजे प्रगतशील, सर्वसमावेशक आणि गतीमान विकासाची हमी असल्याची भावना मतदारसंघात बोलून दाखवली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यामुळे महायुतीचे अधिकृत आणि मजबूत उमेदवार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.
माजगाव मतदारसंघात त्यांच्या कार्याचा ठसा, युवकांमध्ये असलेली पकड आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद पाहता, ही उमेदवारी निवडणुकीचे गणित बदलणारी ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विकासाला गती देणारे तरुण नेतृत्व म्हणून मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकताना स्पष्टपणे दिसत असून, माजगावची लढत आता अधिक चुरशीची होणार, हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!