कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑ॲटम बॉम्ब फोडल्यासारखा आवाज… सिंधुदुर्गात कायद्याच ‘सायलन्स’ का?

*🛑ॲटम बॉम्ब फोडल्यासारखा आवाज… सिंधुदुर्गात कायद्याच ‘सायलन्स’ का?*

 

*🛑सायलेन्सर फोडणाऱ्या गाड्या मोकाट, रुग्ण–पादचारी हैराण; पोलिस आणि परिवहन खात्याची बघ्याची भूमिका.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही दुचाकी वाहनांचे सायलेन्सर म्हणजे जणू ॲटम बॉम्बच बनले आहेत. ठो-ठो, धडाम-धडाम असे कानठळ्या बसवणारे आवाज करत ही वाहने रस्त्यांवरून बिनधास्त धावत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, वृद्ध, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी, पादचारी यांना सहन करावा लागत आहे.प्रश्न असा आहे की नाशिक, पुणे, मुंबईत अशा गाड्यांचे सायलेन्सर जागेवरच फोडले जातात, दंडात्मक कारवाई होते, गाड्या जप्त केल्या जातात; मग सिंधुदुर्गात कायदा वेगळा आहे का?

की इथले हे गाडीचालक पोलिसांचे किंवा परिवहन खात्याचे ‘जावई’ आहेत? असा थेट, परखड प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

रुग्णांच्या वेदनांवर ‘ठो-ठो’चा घाव हृदयविकाराचे रुग्ण, वृद्ध नागरिक, अपघातग्रस्त, हॉस्पिटलजवळील भाग, शाळा–महाविद्यालय परिसर — या ठिकाणी अचानक असा प्रचंड आवाज झाला की रुग्ण दचकतात, बीपी वाढते, मानसिक त्रास होतो.

हे ध्वनीप्रदूषण कायद्याचे सरळ उल्लंघन असताना कारवाई कुठे आहे?

*मोटार वाहन कायदा कागदापुरताच?*

मोटार वाहन कायद्यानुसार सायलन्सरमध्ये बदल, फटाके फोडल्यासारखा आवाज करणारे मॉडिफिकेशन हे गुन्हा आहे.वाहन जप्ती,दंड,परवाना रद्द अशी कारवाई शक्य असताना सिंधुदुर्गात मात्र हातावर हात धरून पोलिस व आर टी ओ खात्याती करीत आहेत.

*पोलीस–परिवहन खात्याची सोयीची शांतता*

दररोज रस्त्यांवरून जाणाऱ्या या गाड्या पोलिसांना दिसत नाहीत का?

परिवहन विभागाच्या तपासणी मोहीमा फक्त कागदोपत्रीच असतात का?की “आपली माणसं आहेत” म्हणून दुर्लक्ष होतंय?जनतेचा रोष वाढतोय कारण कायदा सर्वांसाठी समान असावा ही अपेक्षा इथे फोल ठरत आहे.

*नागरिकांचा थेट सवाल*

“आम्ही नियम पाळायचे, शांत राहायचं आणि काही मोजके लोक दहशत माजवायची?”

“नाशिक–पुण्यात जे शक्य आहे ते सिंधुदुर्गात का नाही?”

“कारवाई नसेल तर आम्ही तक्रार कुठे करायची?”

आता तरी जागे व्हा!

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने विशेष मोहीम राबवावी,सायलेन्सर फोडणाऱ्या, ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर थेट, कठोर कारवाई करावी,अन्यथा हा विषय लोकआंदोलनाचे स्वरूप

घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नागरिक देत आहेत.

*कायदा झोपेत असेल तर दहशत मोकाटच राहते!*

आता प्रश्न हा नाही की आवाज किती मोठा आहे,प्रश्न हा आहे – प्रशासन इतकं बहिरं का आहे?

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!