🛑सिंधुदुर्गातील रिक्षा चालकांवर परिवहन खात्याचा अन्यायकारक निर्णय?
*🛑सिंधुदुर्गातील रिक्षा चालकांवर परिवहन खात्याचा अन्यायकारक निर्णय?*
*🛑१५ वर्षांची वयोमर्यादा रद्द करून २० वर्षे करण्याची मागणी*
*जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- १७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑटो रिक्षांची वयोमर्यादा १५ वर्षे निश्चित करण्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय रिक्षा चालकांच्या दृष्टीने अन्यायकारक आणि वास्तवाला धरून नसल्याचा आरोप करत, ही वयोमर्यादा २० वर्षे करण्याची ठाम मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ, सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांना सविस्तर व कळकळीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
*महानगरपालिका आणि सिंधुदुर्गची तुलना चुकीची*
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असून तेथे १५ वर्षांची वयोमर्यादा योग्य असू शकते.
मात्र पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात एकही महानगरपालिका नाही. येथील नगरपालिका व नगरपंचायती ब, क व ड वर्गात मोडतात. त्यामुळे महानगरांचा निकष सिंधुदुर्गला लावणे चुकीचे असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
रिक्षा व्यवसाय सिझनल, उत्पन्न मर्यादित सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्षा व्यवसाय संपूर्ण वर्षभर चालणारा नाही. गणपती उत्सव, उन्हाळी पर्यटन हंगाम असे फक्त दोन सिझन रिक्षा चालकांना मिळतात.
उर्वरित काळात अनेक रिक्षा चालकांना भाडे तर सोडाच, परतीच्या प्रवासात प्रवासीही मिळत नाहीत, अशी वस्तुस्थिती निवेदनातून मांडण्यात आली आहे.
*जुन्या पण सुस्थितीत असलेल्या रिक्षा धोकादायक नाहीत*
“१५ ते २० वर्षे जुन्या असल्या तरी सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षा चालक आपली रिक्षा फुलासारखी जपतात. त्या चकचकीत, सुस्थितीत आणि नियमित पासिंग झालेल्या असतात,” असे निवेदनात ठामपणे नमूद आहे.
दर पासिंगवेळी परिवहन विभागाकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच रिक्षांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे सर्व जुन्या रिक्षा धोकादायक ठरवणे चुकीचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
*संघटनांना विश्वासात न घेता निर्णय*
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही रिक्षा संघटनेला विश्वासात घेतले नाही, हा गंभीर मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
स्थानिक भौगोलिक परिस्थिती, व्यवसायाची मर्यादा आणि आर्थिक स्थिती यांचा विचार न करता घेतलेला निर्णय रिक्षा चालकांच्या.
उपजीविकेवर घाला घालणारा असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी
जिल्हाधिकारी या पदसिद्ध अध्यक्ष असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती त्यांना पूर्णपणे ज्ञात आहे, असे सांगत१५ वर्षांची वयोमर्यादा तात्काळ स्थगित करून २० वर्षे करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
या निवेदनाच्या प्रती
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव,तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.आता जिल्हा प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे हजारो रिक्षा चालकांचे लक्ष लागले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

