सावंतवाडीत दहावीतील मुलाची आत्महत्या
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील जुना बाजार परिसरात एका आठ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून प्राथमिक पंचनामा करण्यात येत असून घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अल्पवयीन मुलाच्या मृत्यूने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. पुढील तपासानंतरच घटनेबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

