🛑जि. प., पं. स. निवडणुकीची लगबग सुरू.
*🛑जि. प., पं. स. निवडणुकीची लगबग सुरू.*
*🛑आजपासून अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने दाखल होणार – जगदीश कातकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १६:-* जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. पक्षीय अथवा अपक्ष उमेदवारांसोबत त्या-त्या जि. प. अथवा पं. स.मधील एक सूचक असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारी अर्जाच्या तपासणीसाठी तहसील कार्यालयात एकूण सहा टेबलही तैनात केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
गुरुवारी येथील तहसील कार्यालयात आचारसंहिताविषयक पथकांची बैठक घेत कातकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
तालुक्यातील जि. प. व पं. स.निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची विक्री तहसील कार्यालयात करण्यात येणार असून शंभर रुपये अर्जाची किंमत आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी संबंधित उमेदवार हा सिंधुदुर्गातील असणे आवश्यक आहे.त्यासाठीचा सूचक हा उमेदवार ज्या जि. प. मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील असणे आवश्यक आहे.पंचायत समितीसाठीचा उमेदवार हा तालुका पंचायत समिती क्षेत्रातील आवश्यक असून हा उमेदवार ज्या पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहे,त्या पं. स. क्षेत्रातील सूचक असणे आवश्यक आहे.अपक्ष अथवा पक्षीय उमेदवारासाठी एक सूचक आवश्यक आहे.
सर्वसाधारण जागेसाठी जिल्हा परिषद निवडणुकीकरिता एक हजार व आरक्षित जागेसाठी ५०० रुपये अनामत रक्कम असून पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागेकरिता ७०० व आरक्षित जागेकरिता ३५० रुपये अनामत रक्कम आहे.
उमेदवारी अर्जाची तपासणी करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेकरिता दोन टेबल व पंचायत समितीकरिता चार टेबल अशी एकूण सहा टेबल तैनात केली आहेत. १६ जानेवारीपासून सकाळी ११ पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत.फोंडाघाट व खारेपाटण येथील चेक पोस्ट सोबतच तेथे प्रत्येकी आठ तास ड्युटीसाठीची स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. शिवाय,फिरते पथकही तैनात असणार आहे.
तहसील कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.तसेच एक खिडकी सुरू करण्यात आली असून या ठिकाणी आवश्यक परवाने देण्यासाठी महसूल,पोलीस व पंचायत समितीचे कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांची बैठक घेत, आचारसंहिता व नामनिर्देशनविषयक माहितीही देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

