🛑सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे कणकवलीत माघी गणेश जयंती.
*🛑सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे कणकवलीत माघी गणेश जयंती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १६:-* येथील नरडवे रोडवरील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे १७व्या माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २१ ते २३ जानेवारी या कालावधीत हा सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
उत्सवाचा प्रारंभ २१ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेश मूर्तीच्या आगमनाने होईल. मुख्य उत्सवाचा दिवस गुरुवार, २२ जानेवारी असून सकाळी ७वाजता प्राणप्रतिष्ठापना व पूजा, ८ वाजता सत्यनारायण महापूजा, १०.३० वाजता महाआरती, ११ पासून तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद होईल.
गुरुवारी, दुपारी ३.३० पासून भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मेजारेश्वर भजन मंडळ (नागवे), लिंगेश्वर भजन मंडळ (जानवली), राधाकृष्ण भजन मंडळ (जानवली) आणि आई जयंती देवी भजन मंडळ (पळसंब) यांची भजने होणार आहेत. रात्री ८.३० वाजता महाआरती होणार आहे.
उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून गुरुवारी रात्री ९.३० वाजता गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हृळवल यांचा ‘खरी पतिव्रता’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यात ‘कोकणचा बालगंधर्व’ ओमप्रकाश चव्हाण यांची मुख्य भूमिका आहे.
शुक्रवार, २३ रोजी सायंकाळी ५ वाजता सिंधुगर्जना ढोलपथका (कणकवली) च्या गजरात गणरायाची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ, कणकवली यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

