🛑गो-सेवा गतिविधी सिंधुदुर्गतर्फे १७ रोजी गोपालक प्रशिक्षण वर्ग.
*🛑गो-सेवा गतिविधी सिंधुदुर्गतर्फे १७ रोजी गोपालक प्रशिक्षण वर्ग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १५:-* गो-आधारित उद्योग, पर्यावरण संवर्धन व आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या उद्देशाने गो-सेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्यावतीने शनिवार, १७जानेवारी रोजी सरसोली धाम येथे गोपालक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण वर्ग सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये गो-पालनासोबतच गो-विज्ञानाच्या आधारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यावेळी गाईच्या शेणापासून विविध उपयुक्त व पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात गोकाष्ठ निर्मिती, गोमय पणती तयार करणे तसेच गो-नाईल (गोमूत्र व शेणापासून तयार होणारे नैसर्गिक स्वच्छता द्रावण) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापरातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती शक्य असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रशिक्षण वर्गासाठी गो-सेवा गतिविधीचे प्रांतसंयोजक हरिओम शर्मा तसेच प्रांत प्रशिक्षण प्रमुख वैभव चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा लाभ गोपालक, शेतकरी, युवक-युवती व महिलांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी उज्वला. प्रभू-९८५०७८२५९२ यांच्याशी संपर्क साधावा. गो-आधारित उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरेल. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

