🛑मी आमदार किंवा खासदार होणार की नाही हे माहीत नाही, मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अद्ययावत हॉस्पिटल नक्कीच उभारेन-विशाल परब.* *🛑 माडखोल येथील सैनिकभवन चे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि१२- :-*
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील आरोग्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे या समस्येवर उपाय म्हणून अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याची आश्वासन आज विशाल परब यांनी माडखोल येथील सैनिक भवनच्या उद्घाटन प्रसंगी दिले. सह्याद्री पट्ट्यातील प्रत्येक गावात तयार होणारी ही सैनिक भवानी येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आदर्शवत ठरतील व त्यातून भविष्यातील सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरा कायमस्वरूपी सुरू राहील असे मनोगत विशाल परब यांनी व्यक्त केले तसेच युवकांसाठी सर्व सोयीयुक्त असे क्रिकेट स्टेडियम व ग्रामीण भागातील महिला व बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आपले ध्येय असल्याचे विशाल परब यांनी आज माडखोल येथील सैनिक भवन उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात सांगितले.
महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात कोकणातील पहिला सैनिक कॅम्प होण्यासाठी आपण प्रयत्नशील असुन त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले. जिल्ह्यात या आर्मी कॅम्पसाठी जागा उपलब्ध असून हा आदर्श आर्मी कॅम्प देशासाठी रोल मॉडेल करणार आहे. या आर्मी कॅम्प च्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना भरतीपूर्व योग्य ते सैनिकी प्रशिक्षणासह आजी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना सुविधा वेळीच मिळण्यास मदत होणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माडखोल ग्रामदैवत पावणाई मंदिराकडून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर माडखोल परिसरातील दिवंगत माजी सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अकरा वर्षांपूर्वी १४ डिसेंबर २०१४ मध्ये माजी सैनिक सहदेव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली माडखोल आजी माजी सैनिक संघाची स्थापना करण्यात आली. आजी माजी सैनिकांनी संघटित होऊन साकारलेल्या या सैनिक भवनाचे परिसरातून कौतुक होत आहे.यावेळी व्यासपीठावर माडखोल सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते रवि राऊळ, सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक संघटना सचिव संजय सावंत, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, सिंधुदुर्ग तोफखाना रेजिमेंट, अशोक म्हाडगूत, माडखोल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मसाजी राऊळ, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव उमेश कारीवडेकर, सहदेव राऊळ, डॉ लवू सावंत, पांडुरंग सावंत, कारिवडे पूर्व सैनिक संघटना अध्यक्ष आत्माराम साईल,.शांताराम राऊळ, उत्तम कदम, राजाराम राऊळ, राजेश सावंत, भास्कर कोचरेकर, श्री. लिंगवत,, विष्णू ताम्हाणेकर, बीएलचे अध्यक्ष सुभाष सावंत, स्वप्निल राऊळ, दीपक परब आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाला माडखोल उपसरपंच भाऊ कोळमेकर, माजी सरपंच संजय लाड, संजय राऊळ, बाळू शिरसाट, सुबोध राऊळ, केतन आजगावकर, संतोष बिले तसेच कलंबिस्त, शिरशिंगे, देवसू, वेर्ले सांगेली, सावरवाड, कारीवडे गावातील समस्त आजी माजी सैनिकांसह त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त सुभेदार मेजर तानाजी गवळी, सुत्रसंचालन संजीव मोहिते तर आभार माडखोल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मसाजी राऊळ यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

