कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत : पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण.

*🛑सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत : पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण*

 

*🛑प्रेस क्लब च्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली यावेळी चव्हाण यांनी सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी प्रेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव सचिव राकेश परब खजिनदार संदेश पाटील,आनंद धोंड,शैलेश मयेकर,प्रा.रूपेश पाटील, मदन मुरकर, सहदेव राऊळ, साबाजी परब, निखिल माळकर, संजय पिळणकर, विशाल पित्रे, यशवंत माधव,लक्ष्मण आढाव,रेवती वालावलकर, सुनिल आचरेकर, प्रशांत मोरजकर, नाना धोंड, आशिष धोंड आदि उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील महत्त्व सांगितले. आपण देवगड येथे असताना नेहमी पत्रकार दिनी पोभुर्ले ला जात असे त्यांचे कार्य अफाट आणि उंचीचे होते असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. तसेच त्यांच्या कामाचे तसेच कार्याचे कौतुक केले.

यावेळी सिताराम गावडे यांनी सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या कामाची माहिती देत असताना हा प्रेस क्लब एका विशिष्ट परस्थीतीत नावा रूपास आला असून प्रेस क्लब चे महत्व ही त्यांनी पटवून दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजिस्टर संघटना असून प्रेस क्लब च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आपणास यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकाराचे कार्य महत्वाचे असते तेवढेच काम हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे असते त्यामुळे ते सर्व जण आमच्या प्रेस क्लब चे सदस्य आहेत असेही यावेळी गावडे यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष अनंत जाधव यांनी प्रेस क्लब च्या माध्यमातून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असून सामाजिक दृष्टिकोन नजरे समोर ठेवून काम करत आहोत सदस्य कमी असले तरी काम चांगले आहे असे स्पष्ट केले.यावेळी रूपेश पाटील यांनी प्रेस क्लब च्या कामाबद्दल गौरव उद्गार काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश परब यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत संदेश पाटील आनंद धोंड यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!