🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी मुंबईत भव्य उपोषण आंदोलन.
*🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी मुंबईत भव्य उपोषण आंदोलन.*
*🛑६७ वर्षीय कोकणी आजोबांचे आमरण उपोषण; चाकरमान्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावा, तसेच कोकणी चाकरमान्यांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर व्हावी, या मागणीसाठी मुंबईत भव्य उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. मुंबईस्थित महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ यांच्या वतीने कोकण रेल्वे महामंडळाला उपोषणाची अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ६७ वर्षीय मुंबईकर चाकरमानी कोकणी आजोबा हे सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्या वयात निवांत आयुष्य जगायचे, नातवंडांबरोबर वेळ घालवायचा, त्या वयात केवळ कोकणातील पोराबाळांचा आणि मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या नि:स्वार्थ भावनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
सावंतवाडी येथे ‘परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व कोचिंग डेपो’ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता आता ठोस कृती व्हावी, यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. टर्मिनस पूर्ण न झाल्यामुळे चाकरमान्यांना प्रवासात होणाऱ्या अडचणी, वेळेचा अपव्यय आणि गैरसोयी आजही कायम आहेत.
या पार्श्वभूमीवर तमाम कोकणवासी, तरुणाई आणि चाकरमान्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा उभारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या:
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करावे.
सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.
मुंबईकर व कोकणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करावा.
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे महामंडळ, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनामुळे कोकण रेल्वे महामंडळ आणि केंद्र सरकारचे लक्ष सावंतवाडी टर्मिनसच्या प्रलंबित प्रश्नाकडे वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“हा लढा माझ्यासाठी नाही, माझ्या कोकणातील पोराबाळांच्या सुखकर प्रवासासाठी आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया उपोषणकर्त्या आजोबांनी व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

