कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेचे पुरस्कार जाहिर.

*🛑वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेचे पुरस्कार जाहिर.*

 

*🛑अभिमन्यू लोंढे, कल्पना बांदेकर, डॉ. जी. ए. बुवा, आनंद देवळी, स्नेहा नारींगणेकर, महेश काणेकर पुरस्काराचे मानकरी.*

 

*🛑१८ जानेवारी रोजी होणार पुरस्काराचे वितरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०७:-* नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प ोत्साहन मिळण्यासाठी पुरस्कार दिले जातात. दि. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत यावर्षीचे सन २०२५-२६ चे पुरस्कार अभिमन्यू लोंढे, कल्पना बांदेकर, डॉ. जी. ए. बुवा, आनंद देवळी, स्नेहा नारिंगणेकर, महेश काणेकर यांना तर आदर्श गंथालय पुरस्कार श्री रामेश्वर वाचन मंदिर मालवण यांना जाहीर करण्यात आलेले आहेत.

*आदर्श पत्रकार पुरस्कार*

वेंगुर्लेतील स्वातंत्र्यसैनिक तथा दै. लोकसत्ता व दै. नवप्रभा या दैनिकांचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून काम केलेले श्रीकृष्ण सौदागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र अनिल सौदागर यांच्या देणगीतून नगर वाचनालय, वेंगुर्ले तर्फे दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू गणपत लोंढे, (दै. रत्नागिरी टाईम्स) यांना जाहीर करण्यात आला आहे.

*साहित्यीक पुरस्कार*

नगर वाचनालय वेंगुर्ले आयोजित स्व. रमाकांत गुरुनाथ शेटये स्मृती साहित्यीक पुरस्कार श्रीमती कल्पना रावजी बांदेकर यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार वेगुर्ले टोक येथील टांककर शेटये ट्रस्टने पुरस्कृत केलेला आहे.

*आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार*

ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा सौ. सुशीला श्र श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार सावंतवाडी येथील डॉ. जी. ए. बुवा यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार अनिल सौदागर यांनी आपली आई सौ. सुशीला सौदागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे.

*आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार*

ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार आनंद महादेव देवळी, ग्रंथपाल, कै. प्रा. उदय खानोलकर ग्रंथसंग्रहालय, मळगाव (ता. सावंतवाडी) यांना जाहिर झाला आहे.

*आदर्श वाचनालय पुरस्कार*

ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा आदर्श ग्रंथालय हा पुरस्कार आचरा (ता. मालवण) येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर यांना जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार अनंत विष्णु नाईक यांनी आपले वडील स्व. विष्णुपंत गणेश नाईक (माजी कार्यवाह, नगर वाचनालय, वेंगुर्ले) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे.

*व्यापार क्षेत्रासाठीचा साहित्यीक पुरस्कार*

गतवर्षीपासून देण्यात येणारा जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार शिरोडा (ता. वेंगुर्ला) येथील व्यावसायिक सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. व्यापार क्षेत्रात कार्यरत असूनही साहित्याची/वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार अनिल सौदागर यांनी आपले काका स्व. लक्ष्मीकांत सखाराम सौदागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कृत केला आहे.

*बालसाहित्यीक पुरस्कार*

यावर्षीपासून डॉ. श्रीमती शरयू कृष्णा आसोलकर, मराठी विभाग प्रमुख संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या देणगीतून बालसाहित्य लेखक/कवी यांस देण्यात येणारा स्व. कृष्णा न्हानू आसोलकर बालसाहित्यीक पुरस्कार महेश पांडुरंग काणेकर (कणकवली) यांना जाहिर करण्यात आला आहे.

या सातही पुरस्कारांचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रुपये ५,००० असे आहे. सदर पुरस्कारांचे वितरण रविवार दि. १८ जानेवारी रोजी प्रो. डॉ. धनराज गोस्वामी, प्राचार्य बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता नगर वाचनालय, वेंगुर्लेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!