🛑वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांना ‘आदर्श सरपंच सन्मान २०२५’ जाहीर.
*🛑वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांना ‘आदर्श सरपंच सन्मान २०२५’ जाहीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत वेत्येचे सरपंच मा. श्री. गुणाजी अर्जुन गावडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व विकासात्मक कार्याची दखल घेत ‘आदर्श सरपंच सन्मान २०२५’ प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान ISO प्रमाणित व 80G/12A प्राप्तीकर सवलत प्राप्त निती आयोग मान्यताप्राप्त ‘स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम राबवून वेत्ये गावाचा सर्वांगीण विकास साधल्याबद्दल सरपंच गुणाजी गावडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे वेत्ये गावाला तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळाला आहे.
हा पुरस्कार सरपंच संघटित चळवळीचे नेते मा. बाबासाहेब पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा माजली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर (अहमदनगर) येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला सरपंच सेवा संघाचे संपर्क प्रमुख मा. अमोल शेवाळे, सचिव मा. बाबासाहेब पावसे, तसेच संघाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.
‘आपले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे’ या भावनेतून दिला जाणारा ‘आदर्श सरपंच सन्मान’ हा केवळ गौरव नसून ग्रामीण नेतृत्वासाठी प्रेरणास्थान ठरणारा सन्मान असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. सरपंच गुणाजी गावडे यांनी पुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत ग्रामविकासाची हीच दिशा कायम ठेवावी, अशा शुभेच्छा सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या सन्मानामुळे वेत्ये गावासह सावंतवाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून सरपंच गुणाजी गावडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

