कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे आज हलव्याचे दागिने बनविण्याची कार्यशाळा.

*🛑कुडाळ येथे आज हलव्याचे दागिने बनविण्याची कार्यशाळा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०५:-* कुडाळ येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्यावतीने ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता येथील मराठा समाज बालवाडी वर्ग येथे महाराष्ट्रीयन संस्कृतीतील बोरन्हान विधीसाठी पारंपरिक दागिने बनविण्याचे मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत बोरन्हान समारंभासाठी वापरले जाणारे हलव्याचे दागिने तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलींसाठी नाजूक हार, हेअर बँड, बाजूबंध आणि स्टीक बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांसाठी हलव्याचे हार, कानातले, मंगळसूत्र घडविण्याचे कौशल्य शिकविले जाणार आहे. मुलांसाठी पारंपरिक हार, आकर्षक मुकुट, बाजूबंध, स्टीक तयार करण्याचे तंत्र शिकविण्यात येणार आहे. यासोबतच बाजूबंध, कंबरपट्टा व अंगठी बनविण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेमध्ये ही सर्व प्रात्यक्षिके दाखविली जातील. घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी मोबा. ९४२२९६३५२१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मराठा समाज भगिनी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!