कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथा संग्रहाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन.

*🛑मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथा संग्रहाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन.*

 

*🛑बॅरि. नाथ पै सेवांगण, साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०५:-* ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या रौप्यपर्व पूर्ती सोहळा वर्षानिमित्त ‘आगीनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅरि. नाथ पै सेवांगण, मालवण आणि साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या सहकार्याने तसेच ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा रौप्य महोत्सव सोहळा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बॅरि. नाथ पै सेवांगण, मालवण येथील दादासाहेब शिखरे सभागृहात संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांच्या हस्ते होणार असून, कथा अभिवाचन ॲड. अपर्णा परांजपे प्रभु करणार आहेत. ‘आगिनझाडचे मराठी साहित्यामधील योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यात सुप्रसिद्ध अनुवादक वंदना करंबेळकर, कवयित्री ॲड. अपर्णा परांजपे प्रभु, नाट्य व चित्रपट अभिनेते अभय खडपकर व कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात साहित्यिक वैशाली पंडित यांची विशेष मुलाखत डॉ. ज्योती तोरस्कर घेणार आहेत. कार्यक्रमाच्या समारंभ अध्यक्षपदी मा. नमिता कीर उपस्थित राहणार आहेत.

या साहित्यिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साने गुरुजी वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरस्कर, बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर तसेच ऐलमा पेलमा अक्षर देवा समूहाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

या आगळ्यावेगळ्या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!