कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑हत्ती प्रश्नांसदर्भात शरद पवार लवकरच भेट !

*🛑हत्ती प्रश्नांसदर्भात शरद पवार लवकरच भेट !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०३:-* दोडामार्ग तालुका सध्या हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.शेती, मानवी जीवन व मालमतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तालुक्यातील शेतकरी भयग्रस्त अवस्थेत जीवन जगत आहेत.या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या अखेरपर्यंत दोडामार्ग तालुका हत्ती भयमुक्त करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लवकरच भेट घेण्यात येणार आहे.या भेटीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील गंभीर हत्ती समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. वनविभाग,राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या पातळीवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी दिली.

याच भेटीत तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या विकासासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. तिलारी प्रकल्प हा दोडामार्ग तालुक्यासाठी सिंचन, पाणीपुरवठा व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, या ठिकाणी पर्यटक केंद्रांची मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,यासाठी ठोस आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.तसेच आडाळी एमआयडीसीसह तालुक्यातील इतर औद्योगिक व विकास प्रकल्पांद्वारे युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मिती कशी वाढवता येईल,यावरही सखोल चर्चा करण्यात येणार आहे.या भेटीदरम्यान कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, भाजपचे एकनाथ नाडकर्णी, शिवसेना उबाठाचे विजय जाधव, तसेच सरपंच,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आदींना निमंत्रण देणार असल्याचेही संजय नाईक यांनी सांगितले.ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे,असेही नाईक यांनी सांगतिले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!