केसरीचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झिलू सावंत यांचा ६७ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
- केसरीचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झिलू सावंत यांचा ६७ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
सावंतवाडी –
केसरी – मधलीवाडी येथील रहिवासी व गेली तब्बल चाळीस वर्षे सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र झिलू सावंत यांचा ६७ वा वाढदिवस व नववर्षाचे आगमन त्यांच्या मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता केसरी–मधलीवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. समाजसेवा, ग्रामविकास, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजेंद्र सावंत यांची केसरीसह परिसरात ओळख आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना भावी सरपंच म्हणूनही गौरवले आहे.
कै. झिलू बाळा सावंत व कै. गंगाबाई झिलू सावंत यांचे संस्कार लाभलेले राजेंद्र सावंत यांनी कुटुंबासह समाजसेवेला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या वाटचालीत सौ. राजश्री सावंत, मुलगा दत्ताराम सावंत, झिलू सावंत, मुलगी पूजा दळवी, यशिका मोजें, तसेच राजा सावंत यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
या प्रसंगी मा. सुनील पेडणेकर (माजी नगरसेवक, सावंतवाडी) यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित राहणार असून, वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदापुरता न ठेवता तो समाजासाठी समर्पित करण्याची राजेंद्र सावंत यांची परंपरा यावर्षीही कायम राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आयुष्यभर सेवा करणाऱ्या राजेंद्र झिलू सावंत यांना त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त व नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

