🛑साळिस्तेत गुरांची वाहतूक रोखली.
*🛑साळिस्तेत गुरांची वाहतूक रोखली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ३१:-* साळिस्ते येथे गोवा-मुंबई महामार्गावर अवैध आणि निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारा टाटा इंट्रा टेम्पो कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला. या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपयांचा टेम्पो जप्त करून तीन जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ डिसेंबर रोजी रात्री १०.२० च्या सुमारास साळिस्ते बस स्टॉप आणि ग्रामपंचायतीजवळ गोरक्षकांनी अवैध गुरे वाहतूक करणारा टेम्पो थांबवल्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्याला मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या सूचनेनुसार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे,पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे आणि एस. एम. तांबे यांनी तातडीने घटनास्थळी
घटनास्थळी धाव घेतली.
तपासणी केली असता,टाटा इंट्रा वाहनाच्या पाठीमागील हौद्यात एक म्हैस,एक बैल आणि एक वासरू अशी तीन जनावरे अत्यंत निर्दयीपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता बांधलेली आढळली. पोलिसांनी ५ लाख रुपयांचा टेम्पो आणि २९ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडीचा चालक योगेश बाळाराम यादव (४२) आणि त्याचा साथीदार अक्षय अनिल यादव (२१, दोन्ही रा. नाधवडे बौद्धवाडी, ता. वैभववाडी) यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

