कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित.

*🛑जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित.*

 

*🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही.*

 

*🛑जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका.*

 

*🛑जिल्ह्यातील १०२ टॉवर्सना वीज जोडणी : नवीन ३१ टॉवर्सनाही मंजुरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २९:-* सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला केलेल्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेटवर्कची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी ना. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तातडीने ‘पोर्टेबल सेटअप’ बसवण्यात आला असून, यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि संपूर्ण परिसरात बीएसएनएलचे नेटवर्क पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाले आहे.

 

*मुंबईतील बैठकीचा सकारात्मक परिणाम*

काही दिवसांपूर्वीच ना. नितेश राणे यांनी मुंबईत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. जिल्ह्यातील विस्कळीत सेवा आणि रेंजअभावी होणारी नागरिकांची गैरसोय त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील १०२ टॉवर्सची क्षमता वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

१०२ टॉवर्स आता पूर्ण क्षमतेने सुरू

जिल्ह्यात यापूर्वी मंजूर झालेले १०२ टॉवर्स केवळ सौरऊर्जेवर अवलंबून असल्याने पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात बंद पडत असत. ही तांत्रिक अडचण ओळखून ना. नितेश राणे यांनी या टॉवर्सना तातडीने वीज जोडणी (Electrical Connection) देण्यासाठी महावितरण आणि बीएसएनएलमध्ये समन्वय घडवून आणला. आता हे टॉवर्स सौरऊर्जा आणि महावितरण अशा दोन्ही यंत्रणेवर चालणार असल्याने जिल्ह्यातील नेटवर्कची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

 

*बीएसएनएलचे नवे ३१ टॉवर्स मंजूर*

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यात नवीन ३१ टॉवर्स मंजूर झाले आहेत. यामध्ये या दोन्ही नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेंज नसल्याने अधिकारी आणि नागरिकांना मोठा फटका बसत होता. कायमस्वरूपी टॉवर उभारणीसाठी निविदा प्रक्रियेमुळे विलंब होण्याची शक्यता होती. हा विलंब टाळण्यासाठी ना. नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना ‘पोर्टेबल सेटअप’चे निर्देश दिले. त्यानुसार आता तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!