🛑पुण्यात पहिले निलंबन नंतर निलंबन रद्दचा निर्णय, सावंतवाडीत मायनिंग मोकाट!
*🛑पुण्यात पहिले निलंबन नंतर निलंबन रद्दचा निर्णय, सावंतवाडीत मायनिंग मोकाट!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २९:-* पुण्यात चूक मान्य, सिंधुदुर्गात मात्र अभयदान का?महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी मधुसुदन बर्गे यांचा निलंबन आदेश रद्द केला आणि एकच संदेश संपूर्ण राज्यभर गेला —“अवैध मायनिंगवर कारवाई नाही केली तरी फार काही बिघडत नाही!”हा संदेश धोकादायक आहे…आणि तोच संदेश आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील अवैध खाण माफियांसाठी वरदान ठरत आहे.
निलंबन रद्द… पण दोष रद्द नाही!शासन आदेश स्पष्ट सांगतो — अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने नियमभंग झाला.
विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.
मग प्रश्न असा आहे की गंभीर कसूर असताना निलंबन रद्द का?हा आदेश वाचून सावंतवाडीतील खाण व्यावसायिक, दलाल आणि त्यांचे राजकीय-सामाजिक पाठीराखे आज छाती ठोकून सांगत आहेत —
“पहा… वरच्या लेव्हलवर सगळं सेट असतं!”
*सावंतवाडी तालुका : अवैध मायनिंगचा खुला बाजार*
आज सावंतवाडी तालुक्यातील
मौजे कळणे,बांदा,सातार्डा,कवठणीई,साटेली,मळेवाड,कोंढुरे,या भागांमध्ये सुरू असलेल्या दगड खाणी, क्रशर युनिट्स आणि गौण खनिज उत्खननाबाबत वर्षानुवर्षे तक्रारी होत आहेत. परवानगीपेक्षा जास्त खोदकाम
रात्री-अपरात्री डंपर वाहतूक जंगल क्षेत्रालगत उत्खनन ग्रामपंचायतींच्या ठरावांना केराची टोपली,हे सगळं उघडपणे सुरू आहे. मग प्रश्न असा पडतो — हे सगळं महसूल
प्रशासनाच्या नजरेआड कसं काय?
तहसीलदार, एसडीओ, खनिकर्म अधिकारी नेमके काय करतायत?सावंतवाडीत तहसील कार्यालय आहे.उपविभागीय अधिकारी आहेत.खनिकर्म विभाग आहे.पोलीस यंत्रणा आहे.पण अवैध मायनिंग थांबत नाही.याचा अर्थ दोनपैकी एकच —अधिकारी अकार्यक्षम आहेत किंवाअधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत,दोन्ही परिस्थिती गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येतात.पुण्यात कारवाई, सिंधुदुर्गात साटेलोटे?
मावळ तालुक्यातील प्रकरणात तरी शासनाने दोष नोंदवला.निलंबन केले.
चौकशी जाहीर केली.पण सिंधुदुर्गात काय?
इथे तर एकाही अधिकाऱ्यावर निलंबन नाही,एकाही खाण मालकावर कडक कारवाई नाही
एकाही क्रशरवर टाळे नाही
मग सिंधुदुर्ग कायद्याबाहेरचा जिल्हा आहे का?हा आदेश ‘दाखला’ म्हणून वापरला जातोय!आज सावंतवाडीत अनेक खाण व्यावसायिक हा आदेश दाखवत सांगतात —“निलंबन होत नाही… फार तर चौकशी!”हा प्रकार म्हणजे शासन आदेशाचा गैरवापर आहे.आणि हा गैरवापर रोखण्याची जबाबदारी शासनाची आहे.
पर्यावरणाची कत्तल, प्रशासनाची शांतता अनेक ठिकाणच्या संवेदनशील भागालगत खाणकाम म्हणजे —दरडी कोसळण्याचा धोका
जलस्रोत आटण्याचा धोका
भविष्यातील आपत्तीला आमंत्रण
पण महसूल व वन विभाग मात्र — मौन व्रत धारण करून बसलेला आहे.
कोकण लाईव्ह थेट प्रश्न विचारतो
सावंतवाडी तालुक्यातील अवैध खाणींवर गेल्या ५ वर्षांत किती कारवाई?किती दंड वसूल?किती अधिकाऱ्यांवर चौकशी?एकाही अधिकाऱ्यावर निलंबन का नाही?
या प्रश्नांची उत्तरे जर प्रशासनाकडे नसतील, तर हा प्रशासनिक अपयशाचा अधिकृत स्वीकार मानावा लागेल.
आज नाही थांबवलं, तर उद्या उशीर होईल,निलंबन आदेश रद्द झाले असतील,पण जनतेचे डोळे उघडे आहेत.आज कोकण लाईव्ह प्रश्न विचारतोय.उद्या जनता रस्त्यावर उतरेल.आणि तेव्हा — कोणताही शासन आदेश,कोणतीही चौकशी,कोणतेही समर्थनप्रशासनाला वाचवू शकणार नाही.सिंधुदुर्ग प्रयोगशाळा नाही…इथे नियम मोडण्याची परवानगी नाही!हे ध्यानात ठेवावे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

