🛑तळेखोल मध्ये एकच दिवशी बांधले तब्बल तीन वनराई बंधारे.
*🛑तळेखोल मध्ये एकच दिवशी बांधले तब्बल तीन वनराई बंधारे.*
*🛑तळेखोल ग्रामपंचायतीचे पाणी साठवणुकीच्या दिशेने महत्वाचे पाऊल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*दोडामार्ग, दि- २६:-* पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा व्हावा,या उद्देशाने ग्रामपंचायत तळेखोल यांच्या वतीने जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या एका दिवसात तीन वनराई बंधारे उभारून ग्रामपंचायतीने पाणी साठवणुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व सरपंच सौ. वंदना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, गिरीजा दळवी, सुरेखा शेळके, शाम गवस, सिंचल सावंत, उर्मिला गवस उपस्थित होते.
तसेच कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, सहाय्यक कृषी अधिकारी दोडामार्ग विवेक सोनवणे, उपकृषी अधिकारी ए. एस. कोळी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या जलसंवर्धन उपक्रमात नारायण सावंत, पंकज गवस, अक्षय सावंत, अनिकेत सावंत, अनिल सावंत, रामचंद्र सावंत, गणपत दळवी, लता नाईक, राधिका सावंत, अंबिका दळवी, दीक्षा गवस, पार्वती गवस, रेणुका नाईक, मनीष सावंत, ऋषी सावंत यांच्यासह इतर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गावातील ओढे व नैसर्गिक जलप्रवाहांवर उभारण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. शेतकरी, जनावरे तसेच ग्रामस्थांना याचा दीर्घकालीन लाभ होणार आहे.
लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, भविष्यातही जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी असेच उपक्रम राबविण्याचा मानस ग्रामपंचायत तळेखोलने व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

