कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा.

*🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता २०२५-२६ अतिशय उत्साहात आणि खेळमेळीच्या वातावरणात पार पडला. विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, संस्थेचे सदस्य नितीन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका टीना फर्नांडीस, प्रिया मल्हार, क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर आदी उपस्थित होते.

महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारांचे महत्त्व विशद करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान स्पोर्ट्स फेस्ताचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य क्रीडा अविष्कारांचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र तसेच सांघिक विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीना फर्नांडीस व प्रिया मल्हार यांनी केले तर आभार वसंत सोनुर्लेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!