कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नव्या दमाचे नेतृत्व,जुन्या संस्कृतीचा सन्मान!

*🛑नव्या दमाचे नेतृत्व,जुन्या संस्कृतीचा सन्मान!*

 

*🛑ओटवणे गाव चव्हाटा महोत्सवाला भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती; १२ वा महोत्सव उत्साहात संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-*‘गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओटवणे गाव चव्हाटा महोत्सवाचा १२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाचे प्रमुख नेते श्री. विशाल परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमस्थळी विशाल परब यांच्या आगमनानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने व जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना विशाल परब यांनी ग्रामीण भागातील कला, क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. गावातील एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी गावठाणवाडी मंडळाने गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे सुरू ठेवलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ओटवणे गावचे सरपंच दाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, ॲड. अनिल निवर्डेकर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक, गावठाणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेष गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुरान, बाळा गावकर, अमोल गावकर, मंगेश चिले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बाळा गावकर यांनी उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आभारप्रदर्शनपर भाषणातून आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!