कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वाफोली व विलवडे गावाच्या सीमेवर असणाऱ्या काळ्या दगडाच्या क्वारी व क्रशर विरोधात रविवार दि.२१ रोजी तातडीची बैठक.

*🛑वाफोली व विलवडे गावाच्या सीमेवर असणाऱ्या काळ्या दगडाच्या क्वारी व क्रशर विरोधात रविवार दि.२१ रोजी तातडीची बैठक.*

 

*🛑ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवावी.*

 

*🛑सामाजिक कार्यकर्ते विनीत गवस यांचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १९:-* वाफोली विलवडे या परिसरातील असणाऱ्या काळ्या दगडाच्या क्वारी आणि क्रशरच्या विरोधात रविवार दि.२१/१२/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता वाफोली येथील शेतकरी व ग्रामस्थांची समाजिक कार्यकर्ते श्री गुणेश गवस यांच्या निवास्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे.

वाफोली व विलवडे या गावांच्या सीमेवर असणाऱ्या क्वारीमध्ये जे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होते त्यामुळे वाफोली व विलवडे गावातील अनेक घरांच्या भितींना तडे गेले आहेत.यामुळे परिसरातील घरांना व जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.वाफोली गावाला तिथल्या बाग बागायतींना वाफोली येथील ग्रामस्थांसाठी जीवनदायी समजणाऱ्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो मात्र सतत जोरदार होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे वाफोली धरणाला तडे पडत आहेत.याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात ते धरण १००% फुटणार यात शंकाच नाही आणि जर हे घडलं तर येथील ग्रामस्थानी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बाग बागायती ही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.

दिवस रात्र सुरु असणारे क्रेशर मुळे वायू प्रदूषित होत आहे सतत धुळीच साम्राज्य सर्वत्र पसरत आहे यामुळे या प्रदूषणाच्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीला श्वसनाच्या त्रासाला निश्चिचत सामोरे जावे लागत आहे.

या काळ्या दगडाची वाहतूक देखील वाफोली गावातुन मोठ्या

प्रमाणात होते.हे डंपर ओव्हरलोड भरले जातात शिवाय ते रस्त्यातून भरधाव वेगाने धावत असतात तसेच या डम्परांचे ड्रायव्हर भर वेगात मोबाईल वर बोलत असतात यामुळे मोठा अपघात होऊ शकतो या पूर्वीही अनेक वेळा अपघात झालेले आहेत.

या सर्व गलथान कारभाराला आळा बसवण्यासाठी वाफोली गावातील ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते श्री विनीत गवस आणि गुणेश गवस यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित लढा उभारण्यासाठी एकवटतं आहेत.

या परिसरातील होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी अपघात रोखण्यासाठी तसेच परिसरातील निसर्ग,शेती,बाग बागायतींचे रक्षण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री विनीत गवस यांनी दिली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!