कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

ओसरगाव- मळीवाडी,सडेवाडी, येथून चिरे वाहतूक करणारे ट्रक रोखले

*▪️ओसरगाव- मळीवाडी,सडेवाडी, येथून चिरे वाहतूक करणारे ट्रक रोखले*.

*🖥️ Kokan Live Breaking News

*▪️प्रतिनिधी-सुनिल आचरेकर*

*▪️कसाल*
कणकवली तालुक्यातील ओसरगाव, मळीवाडी सडेवाडी, येथील रस्त्यावरील असणारी” मोरी ” चिरे वाहतूक करणाऱ्या अवजड डंपर, ट्रक यांच्या मुळे खचली असून आज या रस्त्यावरील चिरे वाहतूक करणारे ट्रक,डंपर, ग्रामस्थांनी रोखले आहेत.
कणकवली तालुक्यात ओसरगांंव -मळीवाडी, सडेवाडी या रस्त्यावरून गेली अनेक वर्षे चिरे खाणींमधून दिवस रात्रौ डंपर ट्रक या रस्त्यावरून ओव्हरलोड चिरे घेऊन वाहतूक करत असतात. रस्त्यावरील डांबरीकरण रस्ता गायबच झालेला आहे. रस्ता दिसतच नसून पूर्ण हा रस्ता लाल मातीचा तयार झाल्याने मळीवाडी, सडेवाडी ,येथील ग्रामस्थांना, mवाहन चालकांना,रहिवाशांना या लाल मातीचा त्रास सहन करत मार्ग काढावा लागत आहे. याच मळीवाडी रस्त्यावर मोरी खचल्याने ग्रामस्थांनी चिरे वाहतूक करणारे ट्रक डंपर यांना आज रोखले असून या रस्त्यावरून फक्त रिक्षा व मोटरसायकल यांना जाण्यास हा रस्ता बाजूच्या साईडने मोकळा केला आहे.
मालवण तालुक्यात या चिरेखाणी जमीनी येत असून चिरेखानी चां महसूल हा मालवण तालुक्यात घेतला जातो .मात्र कणकवली तालुक्यातून मळीवाडी सडेवाडी कडे हा रस्त्या चिरेखाणी कडे जात असल्याने या रस्तावरुन ट्रक डंपर चालक मालवाहतुकीसाठी जाण्या- येण्या करिता या रस्त्याचा उपयोग करत आहेत. रस्त्याची अक्षरशा दुर्दशा झाली असून रस्त्यावरील मोरी सुध्दा पुर्ण पणे खचल्याने ग्रामस्थांनी आज हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे तर या ठिकाणावरून मोटरसायकल रिक्षा जाण्याकरिता मार्ग ठेवले आहे. याकडे कणकवली तहसील प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे असे ग्रामस्थांचे मागणी असून आज ग्रामस्थांच्या वतीने हा रस्ता रोखला आहे.
कणकवली तालुक्यातील ओसरगाव मळीवाडी सडेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्या वरील ट्रक व डंपर चिरे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोरी खचल्याने वाहतुकीस हा रस्ता बंद केला आहे

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!