🛑चौकुळ येथे गोवा बनावटीच्या दारूवर मोठी कारवाई.
*🛑चौकुळ येथे गोवा बनावटीच्या दारूवर मोठी कारवाई.*
*🛑भरधाव कार सोडून आरोपी जंगलात फरार.*
*🛑₹13.44 लाखांचा मुद्देमाल हस्तगत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सावंतवाडी तालुक्यातील मौजे चौकुळ केगदवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या अज्ञात दोन इसमांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ₹13 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास, चौकुळ–कुंभवडे रस्त्यावर शिवमंदिरासमोर पोलिसांनी संशयित वाहनास थांबण्याचा इशारा दिला असता आरोपींनी वाहन न थांबवता भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली. सुमारे 100 मीटर अंतरावर वाहन रस्त्यावरच थांबवून दोन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलमय भागात पळून गेले.
पोलिसांनी घटनास्थळी हुंडाई कंपनीची टायटन ग्रे रंगाची क्रेटा कार (क्र. MH10 DG 7880) ताब्यात घेतली. वाहनाच्या डिक्कीतून IMPERIAL BLUE WHISKY या गोवा बनावटीच्या 180 मिली मापाच्या एकूण 336 काचेच्या बाटल्या (7 बॉक्स) तर मागील सीटवरून McDowell’s No.1 Original Blended Whisky या ब्रँडच्या 240 बाटल्या (5 बॉक्स) असा दारूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त दारू व वाहनाची एकूण किंमत ₹13,44,000 इतकी आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ)(ई), 81, 83 तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 व 134/187 अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शिंदे (1153), काळे (998), हेड कॉन्स्टेबल जाधव (1027) तसेच पोलीस नाईक गौरव परब यांनी यशस्वीरीत्या केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

