कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा १३ वर्षांचा संघर्ष यशस्वी.

*🛑महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा १३ वर्षांचा संघर्ष यशस्वी.*

 

*🛑नियमित कर्मचारी म्हणून मान्यता.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १२:-* महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर त्यांना न्याय मिळाला आहे. ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, पदोन्नती,भत्ते आणि सेवेत लागू असलेले सर्व लाभ त्यांना मिळणार आहेत.महावितरण कंपनीला हा महत्त्व महत्त्वपूर्ण आदेश पुढील सहा महिन्यांच्या आत अनिवार्यपणे लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र राष्ट्रवादी वीज कामगार मजदूर काँग्रेस (इंटक प्रणित) संघटनेच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या सातत्यपूर्ण संघर्षांचे हे मोठे फलित ठरले आहे.

हा संघर्ष २०१२ पासून सुरू होता. मे २०१२ मध्ये मुंबईतील महावितरणच्या मुख्यालयासमोर तसेच आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी जवळपास एक महिना मोठे आंदोलन छेडले होते.

संघटनेचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते,तर एसइए संघटनेचे ज्येष्ठ नेते आशीष जयंत मेहता आणि कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनी या लढ्याला सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यानंतर आंदोलनाचा मार्ग न्यायालयात गेला. संघटनेतर्फे वकील गायकवाड आणि अॅड. स्मिता डंखे ऊर्फ पाराठकर यांनी न्यायालयात कर्मचाऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. कंत्राटी नियुक्तीमधील विसंगती, कंत्राटदार बदलूनही तेच कर्मचारी वर्षानुवर्षे कायम राहिल्याचे आणि कामादेश

(कार्यादेश) प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर काढल्याचे मुद्दे संघटनेने कागदोपत्री पुराव्यांसह सिद्ध केले.

या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आपला निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रवेशानंतर २४० दिवस पूर्ण झाल्याच्या दिवसापासून नियमित कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क लागू होणार आहेत. तसेच, न्यायालयाने एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे की,जर आदेशाची अंमलबजावणी निर्धारित वेळेत झाली नाही, तर २८ सप्टेंबर २०१२ पासून बाकी

असलेल्या रकमेवर महावितरण कंपनीला वार्षिक पाच टक्के व्याज आकारण्यात येईल. संघटनेचे राज्य संघटक सुनील वाघमारे यांनी या ऐतिहासिक निकालाबद्दल कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे आणि संघर्षांचे कौतुक केले. गेल्या तेरा वर्षांपासून खटल्यातील प्रत्येक टप्प्याची माहिती आम्ही कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवली. कर्मचाऱ्यांचा संघटनेवरील विश्वास अखेर सार्थ ठरला असून आपण ही लढाई जिंकली आहे. पुढेही कर्मचारी हितासाठी संघटना ठामपणे उभी राहील, अशी माहिती सुनील वाघमारे यांनी दिली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!