कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑खर्डेकर महाविद्यालयात “हिंदी के क्षेत्र में रोजगार के अवसर” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

*🛑खर्डेकर महाविद्यालयात “हिंदी के क्षेत्र में रोजगार के अवसर” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे *“हिंदी के क्षेत्र में रोजगार की संभावनाएँ”* या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे वाढते महत्त्व,विविध क्षेत्रांतील उपलब्ध रोजगार संधी आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती मिळावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी हिंदी भाषेतील रोजगारसंधींचे सविस्तर वर्णन करताना हिंदीचे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखित केले. हिंदीचे शास्त्रोक्त ज्ञान आत्मसात केल्यास विविध क्षेत्रांमध्ये उत्तम संधी उपलब्ध होतात,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री सतीश धुरी, अनुवाद अधिकारी (राजभाषा विभाग), कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कारवार हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी पत्रकारिता, अनुवाद, लेखन, पर्यटनक्षेत्र, ई–कॉमर्स, कंटेंट रायटिंग, स्टेनोग्राफी, प्रसारमाध्यमे तसेच सरकारी आणि बिगरसरकारी विभागांमधील रोजगारसंधी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवण्यासाठी ‘कंफर्ट झोन’च्या बाहेर येणे आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी बहुविध ज्ञानाचे आजच्या स्पर्धात्मक युगातील महत्त्व अधोरेखित केले. पर्यटन क्षेत्र, सरकारी नोकऱ्या आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये भाषेचे व्यापक ज्ञान उपयुक्त ठरते. हिंदी ही राजभाषा असल्याने तिच्यात पूरक प्रशिक्षण घेतल्यास करिअरच्या अनंत संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास श्रीमती प्रिया पोकळे (अनुवाद अधिकारी, राजभाषा विभाग, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., बेलापूर) आणि श्री संतोष पाटोळे (अनुवाद अधिकारी, राजभाषा विभाग, कोकण रेल्वे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कनिष्ठ विभागातील प्रा. सौ. एस. वाय. सौदागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कनिष्ठ विभागातील सौ. एस. के. जाधव यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!