कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा.

*🛑सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा.*

 

*🛑कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०८:-* बहुजन समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोशल मीडियावर कुडाळ बस स्थानकातील व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये संबंधित व्यक्ती जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बहुजन समाजासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची माफी मागताना पहायला मिळत आहे. या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, संबंधित व्यक्ती कुडाळ एस. टी.आगारात कार्यरत असून वारंवार बहुजन समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात.तसेच समाजाला नेहमीच गलिच्छ वागणूक देण्याचा प्रयत्न करतात. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी सत्यवान तेंडोलकर, विजय जाधव, मंगेश गावकर, चंद्रकांत वालावलकर, अर्जुन जाधव आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यांनी दोन दिवसात संबंधित व्हिडिओची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!