🛑कोकणचा हापूस हा सर्व आंब्यांचा बापूस -श्री विलास सावंत .* *🛑 कोकणातील राजकीय नेतृत्व गुजरातच्या लॉबी विरुद्ध कोकणातील शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहील का?… शेतकऱ्यांना शंका.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- ७:-*
गुजरात मधील वलसाड येथील आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी गुजरात मधील गांधीनगर व नवसरणी विद्यापीठाने मागणी लावून धरली आहे .त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली असून 30 ऑक्टोबरला पहिली जनसुनावणी झाली .आणि या बातमीने कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होणे सहाजिकच आहे .परंतु भौगोलिक मानांकन ज्याला आपण जीआय मानांकन म्हणजेच जॉग्रफिकल इंडिकेशन म्हणतो ते सहजासहजी मिळत नाही .कारण जी आय मानांकन त्याच वस्तूला मिळते ज्याच्यामध्ये निकषांपेक्षा जास्ती वैशिष्ट्ये असतात .म्हणजे एखादं फळ ज्या भौगोलिक वातावरणात तयार होत असेल तर तेथील मातीतील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तेथिल चविष्ट पाणी तेथिल त्या फळाला पोषक वातावरण या सर्वांचं समीकरण उत्कृष्टपणे जुळल्यानंतर जगातील 164 देशाहून अधिक देशाने संपन्न असलेल्या जागतिक संघटनेच्या निकषात अनेक जन सुनावण्या घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केला जातो .आणि त्यानंतर जीआय मानांकन प्रदान केले जाते .आपल्या महाराष्ट्रात साडेचार लाख हेक्टर जमीन आंबा उत्पादनाखाली आहे त्यातील एक लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र हे कोकणात आहे .त्यातील सिंधुदुर्ग मधील देवगड व रत्नागिरी त्याचप्रमाणे रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यातील आंब्याला 2018 मध्ये जी आय मानांकन मिळाले आहे .आणि जीआय मानांकनाचा हा प्रवास तेवढासा सोपा नाही तर 2003 मध्ये पहिला प्रस्ताव आला .2008 मध्ये रितसर कागदपत्र सबमिट करण्यात आली आणि त्यानंतर दहा वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला आंब्याला जी आय मानांकन मिळाले .त्यापूर्वी चार वर्षे अगोदर काजूला जी आय हे मानांकन मिळालं होतं आणि आता कोकमलाही मिळाल आहे .अलिबागचा सफेद कांदा साताऱ्याचा कंदी पेढा तर कोल्हापूरचं चप्पल या सर्वांनाही जी . आय मानांकन मिळाल आहे .पण जीआय मानांकन मिळविण्यात आपला भारत देश फार मागे आहे सुमारे 37 वस्तूंना भारत देशात जीआय मानांकन मिळाले असून इतर देशात म्हणजे चीनमध्ये 242 अमेरिकेत 192 वस्तूंना जीआय मिळाल आहे . या बाबतीत सर्व देश आपल्या पुढे आहेत .पण आपली कृषी विद्यापीठ याबाबतीत निकराने काम करताना दिसत नाही .राजकारण्या बद्दल तर बोलायलाच नको .मुळात या लोकांचा हा अभ्यासच नाही .सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वेसर्वा समजणारे राणे मंडळी या विषयावर मागच्या दहा-पंधरा वर्षात कधीच बोलले नाहीत .तर सध्याचे उद्योग मंत्री रत्नागिरीचे श्री उदय सामंत हे फक्त एवढेच म्हणतात की कोकणातल्या हापूस आंब्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही .या विषयावर पट्टीचे राजकारणी सारवासारव करताना दिसतात भाजपचे प्रवक्ता तर हापूस आंबा म्हणजे कोकणातीलच आंबा एवढेच भाष्य करतात .यात फक्त एक जमेची बाजू ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनाला आपले पणन मंत्री श्री जयकुमार रावल साहेब आले होते त्यावेळी ओरोस येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तर्फे डॉक्टर भिडे यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक अशी बाजू मांडली होतीआता डॉक्टर भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे त्यांनी निकराने हा लढा उभा केला पाहिजे आपला सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघ निश्चितच या लढ्यात सामील होईल .आता जबाबदारी आपली वाढली आहे .सर्व शेतकरी पेटून उठले पाहिजेत आंदोलन केली पाहिजेत आणि हापूसचा दर्जा हा कोकणाशिवाय इतर कोणालाही मिळू नये कारण या निकषात इतर आंबे गुजरात मधील असतील कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मधील असतील बसूच शकत नाही .आणि बसलेच तर मग गुजरात लॉबीचा विजय असो हे म्हणण्या पलीकडे आपल्या हातात काही राहणार नाही . अशी माहिती सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना सांगितली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

