🛑मळेवाड येथील रस्त्यावरील खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत.
*🛑मळेवाड येथील रस्त्यावरील खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत.*
*🛑रस्त्यावर पडलेले खड्डे अधिकच रुंदावत असल्याने घडताहेत अपघात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* मागील महिन्यांपूर्वी मळेवाड जकात नाका तसेच मळेवाड ते आजगाव सावरदेव पर्यंतचा रस्ता हा डांबरीकरण ,खडीकरण करून खड्डेमुक्त करण्यात आला होता.मात्र सदरील रस्त्यावर खडीकरण,डांबरीकरण झाल्यावर पावसामुळे या रस्त्यावरील केलेले डांबरीकरण खराब होऊन मळेवाड जकातनाका येथील उतारावर (कोंडुरे कडे जाणारा रस्ता) तसेच मळेवाड पूल, सावळवाडी येथील रस्त्यावर अक्षरश: भले मोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात घडत असून,धोका वाढतच चालला आहे.
वाहन चालकांना सुद्धा हे खड्डे चुकविताना सध्या मोठी कसरतच करावी लागत आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून येथील स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्यामुळे आपल्या परीने हे खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले. मात्र सदरील रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण बहुतांशी खराब होऊन त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.मात्र संबंधित विभाग व ठेकदार निद्रिस्त असल्याचे दिसून येते.निदान आतातरी पाऊस गेल्यामुळे हे पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत अशी मागणी वाहनचालक ग्रामस्थ करीत आहेत.
पाऊस गेला ,रस्त्यावरील खड्डे बुजविणार कधी? असा सवाल ग्रामस्थ,वाहनधारक करत आहेत.
सदरील रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण बहुतांशी खराब होऊन त्यावर मोठे खड्डे पडले असून,या नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील पडले खड्डे आता तरी बुजविण्यात यावेत जेणेकरून या खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळता येतील.
रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण उखडल्याने रस्त्यावरील खड्डे अधिकच रुंदावत आहेत,रस्त्यावरील खडी ,दगड रस्त्यावर पसरल्याने गाड्या स्लीप होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत.
त्यामुळे संबंधित विभागाने,ठेकेदाराने लवकरात लवकर खड्डे बुजवून पुढील संभाव्य धोका टाळावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

