निलेश’च्या कामाची अलग बात* *एकनाथ शिंदेंची तडफदार सभा*
*निलेश’च्या कामाची अलग बात*
*एकनाथ शिंदेंची तडफदार सभा*
*विरोधकांना थेट इशारा — “इलाका कोणाचाही असो… धमाका निलेश राणेच करणार!”*
मालवणात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभेने आज अक्षरशः विस्फोट घडवला. भाषणाची सुरुवात होताच सभास्थळी घोषणांचा गजर, महिलांची जबरदस्त उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उफाळून आलेला उत्साह… संपूर्ण मालवणात ‘निलेश राणे’ची जिद्द आणि शिवसेनेचा दम याचा अनोखा माहोल निर्माण झाला.
*शिंदे म्हणाले*—
“ज्याच्यामागे जास्त महिला, त्याचा नंबर निवडणुकीत पहिला!
निलेश राणेंच्या कामाची अलग बात आहे… तोफ डागलीय, विकेट काढलीय… आता मैदानात फक्त भगवीच भरारी घेणार.”
सभेत ‘लाडकी बहीण’ योजनेचा मुद्दा गाजला. शिंदेंनी एकच गोष्ट स्पष्ट केली—“कोणीही मायका-लाल आला तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही!ही माझी लोकांसमोरची शपथ आहे.”
ते पुढे म्हणाले—“मुख्यमंत्री असताना मी कार्यकर्ता म्हणून काम केलं, म्हणून अनेक योजना आणू शकलो. त्यात ‘लाडकी बहीण’ माझी आवडती योजना. आज मालवणात पाहतोय— लाडक्या बहिणींचा महासागर निलेश राणेंच्या पाठीशी उभा!”यावेळी त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर, तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना दणदणीत विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.
*शिंदेंनी राणेंचं प्रचंड कौतुक करताना स्पष्ट घोषित केलं*—
“तुमचा भाऊ निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष!
शिवसेनेचे खणखणीत नाणं!
बाळासाहेबांच्या विचारांची खरी परंपरा निलेश राणे यांच्या कामात दिसते.”तथापि, सभेतील खरा स्फोटक क्षण होता विरोधकांवर केलेली उपमुख्यमंत्र्यांची थेट टीका—
“पराभव जवळ आला की अनेकांचे दशावतार सुरु होतात!पण, या मालवणात कोणतीही नाटकं चालणार नाहीत.इथे सगळीकडे ‘निलेश’च्या कामाची छाप आहे… आणि त्यावर जनता शिक्कामोर्तब करणारच!”
सभास्थळी महिला सैनिकांची उपस्थिती जबरदस्त होती. भगवे वस्त्र, शिवसेना झेंडे, घोषणांचा आवाज — संपूर्ण मालवण आज एका घोषणेला जणू एकवटला होता:
“धमाका एकच — निलेश राणे!”
धडाकेबाज, जोशात आणि तडफदार शिंदेंच्या या सभेने मालवणच्या निवडणूक रणांगणात अगदी ठिणगीच पेटवली आहे.

