कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 श्री. राजू पंडीत यांचे पैशाचे पाकीट प्रकाश बिले यांनी केले परत.

*🛑 श्री. राजू पंडीत यांचे पैशाचे पाकीट प्रकाश बिले यांनी केले परत.*

 

*🛑असाही एक प्रामाणिकपणा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २७:-* बांदा कट्टा काॅर्नर बाजारपेठ या दरम्यान पडलेले पैश्यांचे पाकीट केळी व्यापारी प्रकाश बिले यांना सापडले असता सदर पाकिट मुळ मालक राजू पंडीत यांना केले परत यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्री.राजू पंडीत हे दोन दिवसांपूर्वी बांदा गावात लग्नसमारंभच्या खरेदीसाठी आले होते.त्यांचे मुळ गाव कास आहे. परंतु ते सध्या कामानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आहेत. आपल्या काही नातेवाईकांच्या सोबत ते बांदा मार्केट येथे जात असताना त्यांचे पैश्याचे पाकीट कट्टा काॅर्नर बाजारपेठ दरम्यान पडले.सदर हे पडलेले पाकीट केळी व्यापारी प्रकाश बिले यांना सापडले.त्यांनी तात्काळ याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्या कानावर घातली.साई काणेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती आपल्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर शेअर केली व आपणास संपर्क साधण्यास सांगितले.सदरचा मेसेज पाकीटाचे मालक राजू पंडीत यांच्या निदर्शनास आला त्यांनी साई काणेकर यांना मोबाईल वर संपर्क केला.त्यावेळी साई काणेकर यांनी राजू पंडीत यांना सांगितले की सदरचे एक पाकीट कट्टा काॅर्नर या दरम्यान केळी व्यापारी प्रकाश बिले यांना सापडले आहे तरी तुम्ही येऊन आपली पाकीटाची ओळख पटवून घेऊन जाण्यास सांगितले. राजू पंडीत यांनी बांदा येथे येत साई काणेकर यांच्या मार्फत प्रकाश बिले यांना संपर्क केला आपली पाकीटामधील कागदपत्रे व कीती रक्कम याबद्दल माहिती दिली सदर ते पाकीट राजू पंडीत यांचे असल्याची ओळख पटल्यानंतर त्यांना ते प्रकाश बिले यांच्या हस्ते देण्यात आले.सदर पाकिटात रक्कम होती तरीही प्रकाश बिले यांनी अशा प्रकारे प्रामाणिकपणा दाखवला याबद्दल बांदा गावातून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.राजू पंडीत यांनी प्रकाश बिले व ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांचे आभार व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!