कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विचारधारेला जनतेचे वाढते पाठबळ*!

*पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विचारधारेला जनतेचे वाढते पाठबळ*!

*सावंतवाडीत जोमाने फुलते आहे ‘कमळ’!!*

*भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी अभूतपूर्व झुंबड; सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा नेतृत्वावर वाढता विश्वास आणि अमाप उत्साह !*

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपामध्ये सुरू असलेली प्रचंड ‘इनकमिंग’ची लाट आता जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष वेधून घेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे या नेतृत्वावरील विश्वासामुळे सावंतवाडीत भाजपाचे राजकीय समीकरण दिवसेंदिवस अधिक भक्कम होत चालले आहे.
*भाजपात प्रवेशासाठी सावंतवाडीत झुंबड — सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा ओढा*
निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आणि त्याच क्षणी भाजपात ‘मोठा विस्फोट’ घडला.काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि विविध समाजसंघटनांतील शेकडो कार्यकर्ते आज भाजपात दाखल झाले. सर्वांत विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने युवक-युवतींनी भाजपाचा झेंडा हातात घेत धार्मिक सलोखा, विकास आणि नेतृत्वावरील विश्वासाला शिक्कामोर्तब केले.भाजपाच्या नेतृत्वामध्ये संवादकौशल्य, सातत्यपूर्ण संपर्क आणि वैचारिक समन्वय या गुणांचा कस आज पुन्हा एकदा सिद्ध झाला.
विशेषतः भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या शांत, संयमी आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे पक्षप्रवेशाला प्रचंड वेग मिळाल्याचे चित्र स्पष्ट आहे.
*आज भाजपात दाखल झालेले प्रमुख मान्यवर*
शिवा गावडे — काँग्रेस तालुका उपाध्यक्ष,संतोष तळवणेकर — सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत ज्ञानेश्वर पारधी, पूजा गावडे, श्याम सावंत, संचिता गावडे, सेजल पेडणेकर, संदीप नाईक, धीरज गावडे, खतिजा रेडकर, सिरीन बाडीवाले, रेहाना बाडीवाले, नुजार मुला, साइड फिरझाडे, आयन शेख, आफ्ताब शेख, जियान मेमन, मुस्तफा नासिपुरी, रेहान शेख, प्राणिता सावंत, वैशाली राऊत, अर्पिता सावंत, कल्पना सावंत, सुमित्रा परब, दिशा सावंत, भाग्यश्री भराडी, शरद सावंत, लता गावडे, सोनाक्षी तेजम, यशश्री तळवणेकर, गौरेश गावडे, संगीता परब, सायली गावडे, रंजना कारेकर, लक्ष्मण भुते, निलया बदिरे यांसह अनेक शेकडो सर्वधर्मीय कार्यकर्ते आज भाजपात दाखल झाले.या सर्वांचे भाजपात जोरदार
स्वागत-सत्कार करण्यात आले.
*राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण — सावंतवाडीत भाजपाची पकड मजबूत*
सावंतवाडीतील सध्याच्या राजकीय वातावरणात भाजपात होत असलेली ‘वाऱ्यासारखी’ इनकमिंग ही केवळ निवडणुकीपूर्वीची साधी हालचाल नसून सावंतवाडीतील बदलत्या राजकीय समीकरणाची ठळक जाणीव आहे.भाजपाचे नेतृत्व, विकासाचे अजेंडा आणि कोकणातील राणे कुटुंबाचा प्रभाव — या तिन्ही घटकांनी पक्षाच्या गोटाला मोठा उधाण दिला आहे.
राजकीय विश्लेषकांचा स्पष्ट अंदाज—
“बिहारमधील विजयाचा जल्लोष सावंतवाडीत पुन्हा दिसणार!”
*भाजपाचा निर्धार — सावंतवाडी नगरपरिषदेत ‘कमळ’ फुलवायचेच!*
भाजपात होणारे प्रचंड प्रवेश, मुस्लिम समाजाची साथ, युवक-युवतींचा उत्साह, महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती — या सर्वामुळे भाजपाचे सावंतवाडीतले गणित आता अगदी स्पष्ट झाले आहे.
जनतेतील भावनिक लाट, नेतृत्वावरील विश्वास आणि हजारो कार्यकर्त्यांचे आगमन यामुळे सावंतवाडीचा किल्ला भाजपाकडे झुकल्याचे राजकीय पातळीवर स्पष्ट संकेत दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!