“हॅलो, मी एकनाथ शिंदे बोलतो!” — उपमुख्यमंत्र्यांचा थेट कॉल; निलेश राणेंना ..
“हॅलो, मी एकनाथ शिंदे बोलतो!” — उपमुख्यमंत्र्यांचा थेट कॉल; निलेश राणेंना .
आमदार निलेश राणे यांना मिळाले दहा हत्तीचे बळ!
सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकणच्या राजकारणात आज प्रचंड खळबळ उडवणारी घटना घडली आहे. शिवसेनेचे तडफदार, आक्रमक, कोकणचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट फोन करून निवडणुकीच्या तयारीचा आणि मैदानातील स्थितीचा तपशीलवार आढावा घेतला.फोन लागताच शिंदे यांच्या आवाजातले आत्मविश्वासपूर्ण शब्द—
“हॅलो… मी एकनाथ शिंदे बोलतो”
यांनीच कोकण राजकारणात एक वेगळीच इलेक्ट्रिक लाट निर्माण केली.
शिंदे यांनी मालवण, सावंतवाडी , कणकवली आणि वेंगुर्ल्यातील जनमत, स्थानिक समीकरणे आणि लढतीची दिशा जाणून घेतली. या सर्व ठिकाणी ‘भगवा फडकवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा’, असा थेट आदेशच त्यांनी दिल्याचे समजते.
आमदार निलेश राणे यांनीही जनतेतून उमटत असलेल्या प्रचंड समर्थनाची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली.
त्यांचे शब्द ठाम—“जनतेचा कौल स्पष्ट आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार।”त्यानंतर शिंदे यांनी दिलेला कानमंत्र मात्र कोकणात चर्चेचा विषय बनला आहे.“हिम्मत ठेवा… पाठीशी मी आहे! मैदानात उतरा आणि विजय मिळवा!”या एका फोनने आमदार निलेश राणे यांच्या खांद्याला दहा हत्तींचे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांतून उमटत आहे.
कोकणातील राजकीय समीकरणात उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली निलेश राणेंची दखल ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. ज्येष्ठ नेते, महायुतीची धुरा, आणि सरकारचा थेट पाठिंबा — या तिहेरी बळामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
शिंदे यांच्या या कॉलने एक गोष्ट स्पष्ट झाली—निलेश राणे हे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार आहेत आणि त्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद ठामपणे उभी आहे.
*कोकणात चर्चा एकच*—
“लढा आणि जिंका — शिंदे यांचा आदेश, राणेंची तयारी आणि. उसळणार भगव्याची लाट

