🛑प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणार 50 हजार अतिरिक्त अनुदान.
*🛑प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणार 50 हजार अतिरिक्त अनुदान.*
*🛑सन 2024-25 पासून मंजुरी मिळालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ.*
*🛑शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २१:-* केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ तसेच, विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रु.५०,०००/- एवढे अतिरिक्त अनुदान ग्राम विकास विभागांतर्गत देण्यात येणार आहे. यासंदर्भात मंजूर अनुदान वितरणासाठी नविन लेखाशिर्ष उघडणेबाबत ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.”सर्वांसाठी घरे” हे केंद्र शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारकडून केले जात आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी सुरु केला असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे.महायुती सरकारच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या आनंदाने स्वागत केले असून सर्व सामान्यांच्या मनातील घराचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याची माहिती शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

