कोकणमहाराष्ट्रमालवणसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑मालवण नगर पालिका निवडणुकीत आमदार राणेंचा जोश आणि गोंधळलेले भाजप.

*🛑मालवण नगर पालिका निवडणुकीत आमदार राणेंचा जोश आणि गोंधळलेले भाजप.*

 

*🛑प्यादे वजीर होऊ शकते, वजीर प्यादे होऊ शकत नाही,हे आमदार निलेश राणेंचे शब्द बरेच काही सांगून जातात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴मालवण, दि- १९:-* कुडाळ-मालवण मतदारसंघातील मालवण नगरपरिषद निवडणूक यंदा केवळ राजकीय लढत नसून, प्रतिष्ठेची खऱ्या अर्थाने चुरस ठरत आहे. या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी अतिशय जोरदारपणे मैदानात उतरत संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत मतभेद, उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी, स्थानिक कार्यकर्त्यांचे तुटलेले मनोबल अशी एकंदर गोंधळलेली परिस्थिती दिसत आहे. या दोन भिन्न चित्रांमध्ये मतदारांची नजर आता कुणाकडे झुकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य—“मालवणात शिवसेनेची ताकद शून्य”—हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. राणेंच्या नेतृत्वात दशकानुदशके उभारलेल्या राजकीय आधारावर असे वक्तव्य करणे म्हणजे वास्तवापासून दूर जाणे हे स्पष्ट होते. या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व चैतन्य निर्माण झाले. अनेक शाखांत कार्यकर्त्यांची गर्दी वाढली, उमेदवारांची तातडीने पुन्हा बांधणी झाली आणि कार्यकर्त्यांची नाराजी उडून गेली. शिवसैनिकांसाठी हे वक्तव्य खुद्द आव्हान मानून मैदानात उतरावे असा संदेश ठरला.

कुडाळ-मालवण मतदारसंघात राणे कुटुंबाचे राजकीय अस्तित्व हे केवळ निवडणूकापुरते सीमित नसून, विकासाच्या कामांपासून संघटनेपर्यंत विस्तृत आहे. १९९० साली नारायण राणे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हाचा जोश कार्यकर्त्यांत होता, त्याचा प्रत्यय आज निलेश राणे यांच्या मोहिमेत स्पष्टपणे येतो. त्यांच्या सभांना उपस्थिती मोठी असणे, स्थानिक नेत्यांचे खुले समर्थन, आणि जनतेशी ते जुळवून घेत असलेला थेट संपर्क ही तीन महत्वाची घटक आहेत. शिवाय “विकासाचे राजकारण” हा त्यांचा मुख्य मुद्दा असून, पिताश्री नारायण राणे यांनी केलेल्या कामांचा ते पुनरुच्चार करत आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये स्थिती संपूर्ण उलट दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ‘एकाच कुटुंबातील दोन, तीन व्यक्तींना उमेदवारी देऊ शकत नाही’ हे कारण देत निलेश राणेंना तिकीट नाकारण्यात आले. पण नगरपरिषद निवडणुकीत मात्र त्याच भाजपने एकाच कुटुंबातील दोन-दोन सदस्यांना तिकीट देत स्वतःचीच भूमिका मोडीत काढली. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पत्नींसाठी तिकीट मागितले, तर काहींनी स्वतःच्या घरापुरतेच राजकारण मर्यादित ठेवले. या स्वार्थी राजकारणामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

भाजपमधील अंतर्गत परिस्थिती इतकी गोंधळलेली आहे की काही वॉर्डांमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्याची वेळ आली. अनेक उमेदवारांनी उमेदवारी नाकारली, काहींनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी संबंधित वाडीत न राहता अन्य वाडीत उमेदवारी मिळाल्याने ती नाकारली. एक मोठा पक्ष अशा अवस्थेत असणे हे चिंतेचे लक्षणच म्हणावे लागेल. मूळ कार्यकर्त्यांना तिकीट देण्यापेक्षा आयात केलेल्या व्यक्तींना महत्त्व देण्यात येत असल्याच्या टीका भाजपवर होत आहेत. हा गोंधळ निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची प्रतिमा घसरणारा ठरत आहे.

याउलट शिवसेनेने मालवणात ज्या पद्धतीने तयारी केली आहे, त्यात संघटनेची शिस्त आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ठळकपणे दिसतो. उभे केलेले उमेदवार स्थानिक, जनतेशी नाळ जुळवून घेणारे आणि मतदारांमध्ये चांगली ओळख असलेले आहेत. शाखांमध्ये कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. ‘मोठ्या पक्षाशी लढा, पण जनतेच्या आशेवर विजय’ ही भूमिका शिवसेना खुलेपणाने मांडत आहे. ही तयारी भाजपच्या गोंधळलेल्या प्रतिमेच्या तुलनेत अधिक संगठित आणि प्रभावी भासते.

आमदार निलेश राणे यांच्या बाबतीत सांगायचे तर ते स्वतः जीव ओतून प्रचार करत आहेत. “विकासाचा प्रवास सुरू ठेवायचा आहे” हा त्यांचा मुख्य संदेश असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात तळ ठोकला आहे. दररोजच्या भेटी-गाठी, लहानमोठ्या बैठकांचा धडाका, नागरिकांशी संवाद, आणि व्यक्तिगत पातळीवर केलेले संपर्क यामुळे त्यांच्या मोहिमेला वेग आला आहे. राणे कुटुंबाच्या नेतृत्वावर आजही मोठा विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते.

निवडणुकीत भाजपची सर्वात मोठी अडचण म्हणजे अंतर्गत पडझड. पदाधिकाऱ्यांमधील वैयक्तिक हितसंबंध, ज्या वॉर्डात पक्षाचे अस्तित्वच नाही तिथेही उमेदवारी लादण्याचा प्रयत्न, आयात उमेदवारांना दिलेले तिकीट, गणेश कुशे यांच्यासारखे मोजकेच स्थानिक कार्यकर्ते यांना तिकीट मिळणे—या गोष्टींमुळे पक्षात एकसंधता दिसत नाही. पक्षात नाराजी वाढली आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली, हे भाजपच्या नुकसानाचे संकेत आहेत.

याउलट शिवसेनेचे चित्र अधिक स्पष्ट आहे. उमेदवारांची छाननी ठोस, संघटन सज्ज, आणि कार्यकर्ते पेटून उठलेले. निलेश राणे यांची लोकप्रियता, राणे कुटुंबाचा वारसा आणि नारायण राणेंचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गदर्शन ही शिवसेनेसाठी मोठी ताकद आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करता मालवण नगरपरिषद निवडणुकीत समीकरणे झुकताना दिसत आहेत. एका बाजूला भाजपच्या घराणेशाही,व जमेचे राजकारण आणि अंतर्गत मतभेदामुळे निर्माण झालेला गोंधळ; दुसऱ्या बाजूला शिवसेनेची सुसंगत तयारी, निलेश राणेंचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा उत्साह—या दोन्हींची तुलना केली तर कोण अधिक मजबूत स्थितीत आहे हे स्पष्ट जाणवते.

अंततः मालवण मतदारांची निवड ठरवणार आहे की या मतदारसंघाच्या परंपरेला, विकासाच्या प्रवासाला आणि मजबूत नेतृत्वाला ते प्राधान्य देतात की अंतर्गत कलहाने भरलेल्या गोंधळलेल्या पक्षावर विश्वास ठेवतात. मात्र सध्या तरी निवडणुकीच्या चित्रावर नजर टाकली तर निलेश राणेंच्या बाजूने वातावरण अधिक झुकताना स्पष्टपणे दिसत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!