आणखीदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उपतालुका प्रमुख पदी संदेश राणे तर राजू धर्णे उपतालुका संघटक

🛑 आगामी निवडणुकांसाठी पक्ष रचना मजबूत करण्याचा निर्धार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१८:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटन बळकटीसाठी महत्त्वाचे फेरबदल करत साटेली–भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी संदेश दौलतराव राणे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत तसेच शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर ,जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी व तालुका प्रमुख संजय गवस यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. राणे यांच्या निवडीमुळे मतदारसंघात पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, असे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आले. तरुण नेतृत्व, सातत्याने कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील संवेदनशील भूमिका या गुणांमुळे राणे यांचे नाव पुढे आले असल्याचे सांगितले जाते.

तसेच रिक्त असलेल्या उपतालुका संघटक पदासाठी ज्येष्ठ शिवसैनिक देवेंद्र उर्फ राजू धर्णे यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटनातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ आगामी निवडणूक व्यवस्थापनात होणार आहे. दोन्ही पदनियुक्तीचे निवडपत्र दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस यांसह, जेष्ठ शिवसैनिक तथा नगरसेवक चंदन गावकर, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे,युवा सेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार, विभाग प्रमुख ऑल्विन लोबो, विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, उपविभाग प्रमुख शुभंकर देसाई व प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.

दोडामार्ग तालुका शिवसेनेतर्फे संदेश राणे आणि राजू धर्णे यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!